वासवी व वनिता क्लब चा वतीने सिडको येथे पाणपोई चे ऊधदघाटन...NNL


नवीन नांदेड|
सिडको येथील शिवाजी चौक परिसरात वासवी व वनिता क्लब यांच्या वतीने गुढीपाडवा मुहूर्त वर नव्वद दिवसा साठी पाणपोई सुरू करण्यात आली. या पाणपोईचे उद्धाटन गव्हर्नर माऊली व डॉ.नरेश रायेवार, मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सामाजिक कार्यात वासवी व वनिता क्लब  अग्रेसर असुन या वर्षी उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढल्याने  वाटसरू, पादचारी, नागरीक यांच्या साठी थंड पाणी पिण्यासाठी नव्वद दिवसाचे नियोजन करण्यात आले आहे. या पाणपोई चे उद्घाटन  प्रांरभी माता वासवी यांच्यी पुजा करून व फित कापून  नांदेड गव्हर्नर राजु वटमवार माऊली, डॉ.नरेश रायेवार,अरूण दमकोडंवार, बालाजी रहाटकर,करणसिंग ठाकूर, तुकाराम पातेवार, बालाजी कवटीकवार, सुर्यकांत वटमवार,लक्षमण रेवणवार, गोविंद कवटीकवार, संजय काचावार,आईनाथ कवटीकवार,मयुर बिडवई,साई येरावार,वैभव दोमटवार,संजय जवादवार, गजानन बंडेवार, प्रसन्न ऊतरवार,सुभाष कटकमवार,यांच्या सह समाज बांधव यांच्यी उपस्थिती होती.

सिडको वासवी क्लब चे अध्यक्ष शिवानंद निलावार सचिव बालाजी कवटीकवार कोषाध्यक्ष संदीप येरावार यांनी ऊपसिथीत मान्यवरांच्ये स्वागत केले. सदरील पाणपोई साठ दिवस नागरीकांच्या सौयी साठी उपलब्ध राहणार आहे. या पाणपोई मुळे नागरीकांना थंड पाणी पिण्यासाठी मिळणार आहे. सुत्रसंचलन संजय काचावार यांनी केले,या पाणपोई साठी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी