डोळ्यात मिरची पूड टाकून हिमायतनगर तालुक्यातील फायनान्स कंपनीच्या फिल्ड ऑफिसरला लुटले -NNL

हिमायतनगर पोलीस ठाण्यात २ अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल  


हिमायतनगर, अनिल मादसवार| फायनान्स कंपनीची वसुली करवून हिमायतनगर शहराकडे येणाऱ्या एका फायनान्स कंपनीच्या फिल्ड ऑफिसरला पाठीमागून तोंडावर काळे पट्टे बांधून आलेल्या अज्ञाताने डोळ्यात मिरची पूड टाकून सव्वा लाखाची रक्कम लुटून नेल्याची घटना दि.२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु आहे. दिवस ढवळ्या घडलेल्या या लुटमारीच्या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकारामुळे हिमायतनगर येथील पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे कि, दिनांक २६ एप्रिल रोजीचे दुपारी १३ वाजून ४५ मिनिटाच्या वेळी हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा शिवार येथे भारत फायनान्स इन्कल्युजन लि. शाखा हिमायतनगर मध्ये काम करणारा फिल्ड ऑफिसरला दुचाकीवरून आलेल्या २ अज्ञाताने १ लक्ष १५ हजारांची रक्कम असलेली बैग लुटून पोबारा केला आहे. फिर्यादी हा फिल्ड ऑफिसर म्हणुन काम करतो त्याच कामासाठी दि.२६ रोजी तो होंडा कंपनीचे मोटार सायकल क्रमांक एमएच -26/बीएस-६५२३ ने वसुलीसाठी हिमायतनगर तालुक्यातील मौ. बळीराम तांडा येथुन कर्जाची वसुली करून एकुण १ लक्ष१५ हजार रूपये घेवुन बळीराम तांडा येथुन पोटा मार्गे हिमायतनगरला येत होता.

तो वसुलीची रक्कम घेऊन निघाला असता त्याच्यावर पळत ठेवलेल्या कुणीतरी दोन अनोळखी ईसम  पाठीमागुन आले. त्यांनी तोंडावर काळा कपडा घातलेले होते. अचानक त्यांनी आपली दुचाकी समोर आणून फिर्यादीस थांबवुन सुमेध यांचे डोळयात मिरचीपुड टाकुली. आणि सुमेध लक्ष्मण डोंगरे जवळील बॅग ज्यात नगदी १,१५,०००/-रूपये होते ती बैग जबरीने चोरून नेले. या घटनेने भयभीत झालेल्या सुमेध लक्ष्मण डोंगरे, वय २५ वर्षे, व्यवसाय खाजगी नौकरी रा. जामदरी ता. भोकरहल्ली मुक्काम आर्शिवाद कॉम्पलेक्स हिमायतनगर जि.नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या डायरीत गुरनं ७८/२०२२ कलम ३९२, ३४ भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन व त्यांचे सहकारी करत आहते.  


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी