देगलूर तालुक्यातील रेती विषय कार्यवाही बिलोली प्रशासनाचे धज्जे उडवणारी ठरली -NNL


बिलोली/नांदेड।
बिलोली तालुक्यातील रेती वाहतुकीबाबत देगलूर तालुक्यातील महसूलच्या अधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही बिलोली येथील महसूल प्रशासनाचे धज्जे उडवणारे असल्याचे स्पष्ट झाले.

बिलोली येथील महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी "दिन जाव, रेती के गंडे आव" अशी भूमिका घेत नायगाव तालुक्यातील रहिवाशी असलेल्या परमेश्वर नामक व्यक्तीच्या मदतीने वसुली ची भूमिका व्यवस्थित बजावत असल्याचे रेतीच्या व्यवसायातील व्यक्तीने सांगितले. " परमेश्वर "यांच्या मदतीला नांदेड येथील "ऋषी" नामक व्यक्तींच्या सहाय्याने सदर उपक्रम चालत असल्याचे सांगण्यात आले. 

या बाबत गुप्तचर विभागाकडून चौकशी होऊन दोषी आढळले तरच कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे दरम्यान आतापर्यंत एकूण किती रक्कम वसूल करण्यात आली? हे चौकशी केल्यावर लवकरच स्पष्ट होईल. विशेष म्हणजे रेती व्यवसायिकांनी एकत्र येऊन आपले गाऱ्हाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडले होते. असे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर प्रशासनाची बैठकही घेण्यात आली होती. असेही प्रामाणिक असलेल्या एका अधिकाराने खासगीत स्पष्ट केले. केवळ तीनच अधिकारी या वसुलीत सहभागी झाल्यामुळे इतर अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

वीस दिवसापूर्वी गाऱ्हाणे मांडल्यानंतरही वसुली आणि अवैध उत्खनन व वाहतूक सुरूच आहे. याबाबत देगलूर येथील नवनियुक्त अधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही ही बिलोली तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या अवैध प्रकार याला दुसरा देणारी ठरली. बिलोली तालुक्यातील गैरव्यवहार बिलोली तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिसला नाही देगलूर तालुक्यातील अधिकाऱ्यांना कसा लक्षात आला? सध्या बिलोली येथील भ्रष्ट प्रशासनाचे धज्जे उडवणाऱ्या देगलूर आणि मुखेड तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक होताना दिसून येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी