नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मुलभूत सुविधा अंतर्गत विकासात्मक कामांच्या शुभारंभ राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते २८ मार्च रोजी झाल्या नंतर विकास कामाला तात्काळ शुभारंभ करण्यात आला होता, वाघाळा पि वन पि टु ,वाघाळा मुख्य रस्त्याचा खोदाई खडकीकरण ,मुरूम नंतर दबाई करण्यात आल्या नंतर या डांबरीकरण कामांचा शुभारंभ २७ एप्रिल रोजी मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी व मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, नगरसेवक अमित तेहरा, सुभाष रायबोळे,संदीप सोनकांबळे,श्री निवास जाधव, माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे, नगरसेवक प्रतिनिधी विठ्ठल पाटील डक ,माजी नगरसेवक अशोक मोरे, संजय मोरे, माजी नगरसेविका सौ ललीता शिंदे, डॉ.करूणा जमदाडे, आर.जे.वाघमारे,के.एल.ढा कणीकर,आंनदा गायकवाड, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, बांधकाम विभागाचे उप अभियंता अरुण शिंदे,कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी व गुतेदार फौजी यांच्या सह मान्यवरांच्यी ऊपसिथीती होती.
गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता डांबरीकरण नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते, कामांचा शुभारंभ व तात्काळ डांबरीकरण या मुळे काही दिवसांत नागरीकांना हा डांबरीकरण रस्ता खुला होणार आहे,या रस्ता मुळे हडको,वाघाळा मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते जोडले जाणार आहेत.