ढोल बजाव आंदोलन हे आदिवासी कोळी महादेव व आदिवासी मनेरवारलू समाजाची दिशाभूल करणारे - अशोकराव गजलवाड -NNL

सभागृहामध्ये समाजाचे प्रश्न पोटतिडकीने मांडणाऱ्यां आमदारांवर खोटे आरोप करणाऱ्यांना आदिवासी समाज जागा दाखवणार ...


मुखेड, रणजित जामखेडकर।
दि.४ रोजी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. डॉ.तुषार राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आदिवासी कोळी आदिवासी मनेरवारलू समाजातील बांधवांना चुकिचा संदेश देऊन तालुक्यातील ४ वसुली सम्राट दलाल मंडळींनी च्या वत्तीने ढोल बजाओ आंदोलन केले. या ढोल बजावो आंदोलनास मुखेड -कंधार मतदार संघातील आदिवासी कोळी समाज व आदिवासी मुन्नेरवारलू समाज बांधवाने बहिष्कार टाकला होता. 

लोकप्रिय आ.डॉ. तुषार राठोड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासी कोळी आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या रखडलेल्या जातपडताळणी संदर्भात सभागृहामध्ये प्रश्न मांडले व महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरून समाज बांधवांची जाणीवपूर्वक आर्थिक पिळवणूक करणाऱ्यां औरंगाबाद येथील जातपडताळणी समितीचे सह आयुक्त दिनकर पावरा यांची तडकाफडकी बदली केली परंतु काही समाजातील दलालांनी भोळ्या भाबड्या आदिवासी समाजाची फसवणुक व दिशाभूल करून चुकिचा संदेश देऊन हा मोर्चा काढला .

आयोजकांनी मोर्चोमध्ये ४ ते ५ हजार लोक येणार असल्याचे आव आणले होते परंतु प्रत्यक्षात मोर्चामध्ये ६० ते ७० लोकांचीच उपस्थिती होती तर यामध्ये आदिवासी बांधव किती उपस्थित होते याबाबत आयोजकांनी आत्मचिंतन करावे असे ही म्हणाले व पुढे बोलताना सांगितले की मुखेडचे लोकप्रिय आ.डॉ तुषार राठोड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासी कोळी आदिवासी मनेरवारलू समाजाचे प्रश्न सभागृहात मांडुण समाजातील शोषीतांना न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार साहेबांचे अनेकांनी अभिनंदन केले पण समाजातील काही खंडणी खोर , वसुली सम्राट गुटखा , रेतीच्या गाड्या अडविणारे, सागवण चोर, मेडिकल चालकांकडून खंडणी वसुली किंवा  समाजाच्या नावावर पैसे जमा करून मुंबई सारख्या ठिकाणी आपले दोन - दोन मजली इमारती बांधणाऱ्या समाजातील भामट्यांना येत्या ९ तारखेला आदिवासी कोळी आदिवासी मनेरवारलू समाज बांधव त्यांची जागा दाखवणार आहेत.

आदिवासी कोळी आदिवासी मनेरवारलू समाजाचा ज्वलंत प्रश्न सभागृहामध्ये मांडुण सरकारला धारेवर धरून समाजाची जाणीवपूर्वक आडवणुक करणाऱ्या औरंगाबाद येथील आदिवासी जात प्रमाणपत्र जातपडताळणी सहा. आयुक्त दिनकर पावरा या मुजोर अधिकाऱ्यांची तडकाफडकी ठाणे येथे बदली केली व समाजाच्या मागणीसाठी सरकारकडे आवाज उठविल्या बद्दल तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी समाज बांधवांच्या वतीने येत्या ९ तारखेला शहारातील वाल्मिक नगर येथील वाल्मिकी ॠषी मंदिर परिसरात लोकप्रिय आ.डॉ.तुषार राठोड यांचे जंगी स्वागत भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार सोहळ्यास तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आदिवासी कोळी , कोळी महादेव समाज महासंघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक गजलवाड यांनी दिली.

तालुक्यात गुटखा, मटका, कल्ब, सागवान तस्करीचे अवैध व्यवसाय चालवणारे, शासकीय अधिकाऱ्यांकडून हप्ते, खंडणी वसुली करणारे भामटे  गोरगरीब आदिवासी जनतेला विविध योजनांची आमिष दाखवून तालुक्यातील भोळ्या भाबड्या जनतेला लुबाडून हजारो रुपये घशात घालण्याऱ्यां त्या चार दलाल लोकांनी ढोल बजाओ आंदोलन काढुन समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी दुसऱ्यावर टिका करण्या आगोदर आपण स्वतः काय करतो ? समाजात कसे वागतो ? स्वतः याबाबत थोडे आत्मचिंतन करावे आणी बोलावे! येत्या ९ तारखेला तालुक्यातील आदिवासी कोळी आदिवासी मनेरवारलू समाज बांधवांनी यांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही.असेही ते प्रसार माध्यमांसी बोलतांना सांगितले आहे.

मागील अनेक वर्षापासून आदिवासी मन्नेरवारलू व आदिवासी कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विलंब लागत होता . यासाठी जबाबदार असलेले अधिकारी दिनकर पारवा यांची बदली करण्यासाठी मी शासन दरबारी आग्रही मागणी केली होती व त्या मागणीला यश प्राप्त झाले व त्यांची तडकाफडकी ठाणे येथे बदली झाली आहे. अशी प्रतिक्रिया आ.तुषार गोविंदराव राठोड यांनी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी