पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; नायगाव तालुक्यातील खळबळजनक घटना-NNL


नायगाव, दिगंबर मुदखेडे।
रामतीर्थ पोलीस अंतर्गत असलेल्या बेळकोणी तालुका बिलोली येथील रहिवासी शेतकरी नामदेव नरसिंगराव टोकलवाड यांनी किरकोळ वादाच्या कारणा वरून पत्नीचा खून करून स्वत आत्महत्या केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नायगाव तालुक्यातील मौजे बेळकोणी बुद्रुक येथील रहिवासी असलेली एक कौटुंबिक दाम्पत्य त्यांच्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला त्या किरकोळ वादाचे रूपांतर शेवटी अंत आला गेली आहे नामदेव नरसिंह टोकलवाड यांनी आपल्या पत्नीला शेताकडे बोलावून घेऊन त्यांच्यामध्ये किरकोळ वाद निर्माण झाला आणि त्यामध्ये या वादाचे रूपांतर वाढत गेले.

 त्यामध्ये पती नामदेव राव यांना राग अनावर झाला त्या रागाच्या भरात त्यांनी पत्नीचे कुर्‍हाडीने तुकडे करून पत्नीच्या हत्या केली आपले गुड लपवण्याच्या कारणावरून  त्या पत्नीच्या साडीला लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली या घटनेची माहिती रामतीर्थ पोलीस ठाणे यांना समजताच त्यांनी सकाळी 11:00 वाजता घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे .

पत्नी रंजना शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसतात अचानक पतीने स्वतःवर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपली ही घटना मंगळवारी  बिलोली तालुक्यातील बेळकोणी बुद्रुक येथे घडली आहे.साहेब पोलीस निरीक्षक विजय दादा आणि उत्तरे तपासणीसाठी त्यांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे उत्तर तपासणीसाठी पाठवली  आहेत. बेळकोणी व पुणे परिसरातील या घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहेया घटनेमुळे दोन मुले व एक मुलगी यांचे छत्रछाया पासून पोरकी झाली आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी