नांदेड| प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बाबू जगजीवन राम यांची ११५ वी जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात श्री संत रोहिदास तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेडच्या परिसरात समता दिन म्हणून साजरी करण्यात आली. बाबू जगजीवनराम यांच्या मूर्तीस दलित मित्र चंद्रकांत घोडजकर यांच्या शुभहस्ते पुष्पमाला अर्पण करुन सर्व उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले.
तत्पूर्वी बाबू जगजीवनराम स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष वामनराव विष्णुपूरीकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी जगजीवन राम यांच्या कार्याची विस्तृतपणे माहिीती देत असताना बर्याच वेळेस प्रधानमंत्री पदाची हुलकावनी तत्कालीन राजकारण्यांकडून देण्यात आल्याचे नमूद करुन त्यांना भारतरत्न पुरस्काराने केंद्र शासनाकडून सन्मानीत करण्यात यावे अशी मागणी वामनराव विष्णुपूरीकर यांनी केली.
प्रस्तुत कार्यक्रमास इंद्रजित ज. पांचाळ (वंचित बहुजन आघाडी), मधुकर ग. आढाव (ग्रा.प.स.), भगवान ना. वाघमारे (अध्यक्ष ऑटो संघटना), पत्रकार दिगंबर छ. शिंदे, संभाजी पा. जाधव, डॉ. विवेक पदमणे, ऍड. प्रमोद कामठेकर, गुंडप्पा ब. बारोळे, प्रकाश ह. झुंझुरवार, शंकर चं. अन्नपूर्णे, रघुनाथ कि. वाघमारे, रामराव छ. वाघमारे, अरुणकुमार वर्णे, शांताबाई आडपवार, सागराबाई वाघमारे, पार्वतीबाई झुंझूरवार, अश्विनी झुंझूरवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नांदेड दक्षिण विभागाचे लोकप्रिय आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांच्या कौठा, नांदेड येथील संपर्क कार्यालयात त्यांचे अधिकृत प्रतिनिधी प्रथमवेश संतोष पावडे यांच्या शुभहस्ते बाबू जगजीवन राम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.