नांदेड| लेबर कॉलनी येथील रहिवासी प्रा. शेख बुशरा शफी अहमद यांनी पीपल्स महाविद्यालय नांदेडचे प्राचार्य डॉ.रावसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली " नासिरा शर्मा के कथा साहित्य में अल्पसंख्यांक : जीवन दर्शन " या विषयावर सखोल संशोधन करून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे शोधप्रबंध सादर केला.
त्यावर त्यांची मौखिक परीक्षा होऊन मुंबई विद्यापीठातील डॉ.संजय गपाट यांच्या सकारात्मक अहवालानुसार त्यांना वरील संशोधन कार्यासाठी विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली.
शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पदवी मिळवल्याबद्दल त्यांचे शेख शफि अहमद ,प्रा.मजहर सर, डाॅ.उस्मान गणी प्रा.डाॅ. सय्यद वाजिद,प्रा. बाबासाहेब भूक्तरे, प्रा.डाॅ.सुभाष रगडे,डाॅ. अविनाश कोलते प्रा.खान नदीम,प्रा.अब्दुल आहाद सर,प्रा. शेख नजीर सर,प्रा. सलमान सर,प्रा.भांडवलकर सर,प्रा.निजाम सर,प्रा. संभाजी थोरात सर, मोहम्मद शेख शहजाद,शेख तन्वीर, सय्यद झुवाद सय्यद वाजिद, अक्षय हसेवाड यांनी अभिनंदन केले आणि भविष्यकाळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या