वाहतुकीच्या कोंडीने हदगाव शहरवासी वैतागले ...NNL

हदगाव शहराची वाहतूक समस्या बनली गंभीर ....!


हदगाव, शे.चांदपाशा|
हदगाव शहरातील समस्या अतिशय गंभीर बनलेली असुन, नादेड रोडवरील उमरखेड टी पाईट हे अपघाताचे मोठे केद्र बनल्याचे दिसुन येत आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने कोणते वाहन, कोठुन येते हे कळावायास मार्ग नसुन, अश्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी तातडीने उपाययोजना करन्याची अवश्यकता आहे. पण पोलिस आमच्याकडे पोलिस बल कमी आहे रोडचे काम सुरु असल्याचे कारण आपली जबाबदार झटकत असल्याचे दिसुन येत आहे.

हदगाव शहरात तामसा टी पाईट, राठी चौक, बस्थानक परिसर, तसेच राठी चौक, आझाद चौक ते माजी खासदाराचे निवास्थानचा रोडच्या परिसरात जर शहरात ऐखादी अप्रिय घटना झाली तर अग्निशमन वाहनाला या रोडवरुन या वाहतुकीमुळे प्रचंड अडथळा होऊ शकते. कारण कोणतेही नियम धाब्यावर बसवुन काही विविध वाहने सुसाट वेगाने पळवित आहेत. नेहमी वाहतुक विस्कळीत होण्यामध्ये काही बालक टुव्हिलर वाहनांचे ही योगदान दिसुन येत आहे.

ओव्हर टेक .... हदगाव शहरात वाहन चालकांना ओव्हरटेक कोठुन करावे ह्याचे सुद्धा भान नसते. त्यामुळे नाहक या उपद्रवी वाहनचालकांचा ञास सहन कराव लागत आहे. डाव्या बाजुने करु नये हे पथ्य तर पाळले जात नाही राँगसाईड वाहन चालविणे ही एक 'फँशन'होऊ पाहत आहे. यावर पोलिसांची कारवाई अपेक्षित असते पण तश्या कारवाईया फार कमी असल्याचे पोलिस दप्तरी दिसुन येत आहे.

तामसा टी पाईट चिंताजनक .... हदगाव शहराती सर्वात धोकादायक तामसा टी पाईटची स्थिती आहे. येथे नेहमी वाहतुक विस्कळीत होते येथील स्थिती हातळतांना पोलिसाना सतर्क राहव लागत. परंतु पोलिसांच संख्या बळ कमी असल्याने वाहतुकीचा नेहमी येथे खोंळबा होत आहे. या मार्गावर प्रत्येक दिवशी वाहतुकीची समस्या भेडसावते. या बाबतीत पोलीस व न.पा प्रशासनाने शहर वाहतुकीचा आढवा घेण्याची आवश्यकता आहे. पण याकडे लक्ष दयावयास वेळ नसल्याने हदगाव शहरात वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी