जनशक्ती संघटनेने दिला ईशारा
पुढे त्यांनी निवेदनात असेही नमूद केले आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला असून राजकीय पाठबळ असणाऱ्या व शुभ्र कापड परिधान करून काळाबाजार करणाऱ्या माफियांचा हैदोस सर्वत्र पसरला आहे त्यात हे माफिया गोरगरिबांचा तोंडात अन्नाचा घास जाणाऱ्या स्वस्त धान्याचा माल गोडाऊन मधून निघाल्यानंतर त्याचा प्रवास थेट काळ्याबाजारात या माफिया मार्फत केला जातो ही बाब अत्यंत दुर्देवी असून या बाबीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे तसेच नांदेड जिल्हा जिल्ह्यात हेच शुभ्र कापड परिधान करून काळे धंदे करणारे माफिया मटकाकिंग नावाने ओळखले जातात हे मटकाकिंग यांच्या बुक्या राजरोसपणे रहदारीच्या व प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वस्त्यांमध्ये त्यांनी दुकानदारी थाटली आहे.
या लोकांच्या बुक्या शिवाजी नगर, नई आबादी, तेरा नगर, खडकपुरा, देगावचाळ, वजीराबाद, बस स्टॅन्ड, रामसेतु पुल, नवा मोंढा, गाडीपुरा, इतवारा, शांतीनगर, चौफाळा, देगलूर नाका, सिडको, दत्तनगर, अण्णाभाऊ साठे चौक, नवा मोंढा, महाराणा प्रताप चौक, वर्कशॉप कार्नर, राजकार्नर, माणिक नगर, इस्लामपुरा मालटेकडी येथे तुफान वेगाने चालत असून गोरगरीब मजूर लोकांचे संसार यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. पण एवढ्या ठिकाणी हा धंदा चालत असून तो नांदेड पोलिसांना मात्र दिसत नाही कारण नांदेड पोलीस ध्रुतराष्ट्राची भूमिका पार पाडत आहेत.
महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीवर उत्पादनावर बंदी घातलेली असून सुद्धा नांदेड जिल्ह्यात मात्र गुटखा पान टपरी ते किराणामालाची दुकाने येथे राजरोसपणे विक्री होत आहे आणि हा गुटखा कर्नाटकहुन हाणेगाव मार्गे पोलीस स्टेशनला चिरीमिरी देऊन तेथून सन्मानपूर्वक नांदेड जिल्हात दाखल होत आहे यामध्ये पण शुभ्र कपडे परिधान करणारे लोक सामील आहेत हा गुटखा हिमायतनगर, हदगाव, तामसा, अर्धापूर, मुदखेड, देगलूर, नरसी, नायगाव, भोकर व बर्याच ठिकाणी हे माफिया पार्सल पाठवत आहेत.
शालेय पोषण आहार वाटप करण्यासाठी ज्या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत त्या गाड्यांची पण चौकशी करण्यात यावी कारण यामध्ये संबंधित शाळेचे मुख्याध्यापक शालेय शिक्षण समिती व गटशिक्षण अधिकारी हे सर्वजण या माफीयांना कडून चिरीमिरी घेऊन साथ देतात त्यामुळे त्यांची पण चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी पुढे असा ही इशारा दिला आहे की काळ्याबाजारात जाणाऱ्या स्वस्त धान्याच्या व शालेय पोषण आहाराच्या गाड्या ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी गाड्या अडवून तो माल आपल्या निदर्शनास आणून देऊन रस्त्यावर गाड्या खाली करून गोरगरीबांना लाईन लावून वाटप करण्यात येईल.
अशा आशयाचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून सदरील निवेदनावर उमाकांत पाटील तिडके ( प्रदेश कार्याध्यक्ष ) शंकरसिंह ठाकूर ( जिल्हाप्रमुख नांदेड दक्षिण) बाळू पाटील शिरफुले (जिल्हाप्रमुख नांदेड उत्तर) दिनेश पाटील जाधव (जिल्हा सचिव) मारोती शिकारे ( जिल्हा कार्याध्यक्ष) शेख जावेद लहानकर (विधानसभा अध्यक्ष बी एम पी) विद्या वाघमारे (जिल्हाप्रमुख महिला आघाडी नांदेड) रजनी मेडपल्लेवार (जिल्हा प्रमुख महिला आघाडी नांदेड) क्रांती भालेराव (तालुका अध्यक्ष कंधार महिला आघाडी ) इत्यादींच्या स्वाक्षऱ्या त्या निवेदनावर आहेत.