हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय परिसरातील आठवडी बाजार पूर्ववत जागेवर भरविणार - आ.जवळगावकर -NNL

अंमलबजावणी लवकर व्हावी म्हणून नगरपंचायत प्रशासक, मुख्याधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार


हिमायतनगर|
शहरातील ग्रामीण रुग्णालयात परिसरात आठवडी बाजार भरविला जात असल्याने उपचारासाठी येणाऱ्या सर्व सामान्य नागरिक, महिला पुरुषांसह अतीगंभीर रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अश्यात एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी येथील आठवडी बाजार पूर्ववत ठिकाणी भरविण्यात येईल. याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी म्हणून नगरपंचायत प्रशासक, मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी यांची एक संयुक्त बैठक घेतली जाईल अशी माहिती हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पोलीस स्थानक परिसरातील आठवडी बाजार चौपाटी आणि ग्रामीण रुग्णालय भागात भरविल्या जात आहे. कोरोनामुळे यामुळे काही अडचण झाली नाही, परंत्तू आता या आठवडी बाजारचे स्वरूप वाढत चालल्याने बाजारच्या दिवशी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात मोफत उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसह नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आठवडी बाजारामुळे अपघात, अतीगंभीर रुग्ण, विष प्राशन, सर्पदंश, वन्य प्राण्यांचा हल्ला झालेल्या रुग्णाला घेऊन येताना - जाताना बाजारच्या गर्दीमुळे आणी लावण्यात येणाऱ्या दुकानांमुळे मोठा त्रास होत आहे. एवढेच नाहीतर रुग्णालयाच्या आवारात खाजगी वाहने लावली जात असल्याने शासकीय रुग्णालयाचे रूपांतर वाहन थांबायचा झाल्याचे दिसते आहे.


त्यामुळे अनेक जाग्रूक नागरिकांनी, रुग्णालय प्रशासनाने देखील नगरपंचायतीस व तहसीलदारांना लेखी पत्र देऊन आठवडी बाजार पूर्ववत ठिकाणी हलवून रुग्णांची गैरसोय टाळावी अशी विंनती केली. यावर नगरपंचायत प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे आठवडी बाजारचे स्वरूप वाढले आहे. यामुळे रुग्णांना व नातेवाईकांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झालं आहे. नुकतेच एका रुग्णाला याचा अनुभव आला असून, थोडक्यात रुग्ण बचावला अन्यथा रुग्णांचे प्राण जाण्याचं वेळ आली होती. या प्रकारानंतर काल दि.२० एपरील रोजी आरोग्य मेळाव्याच्या निमित्ताने आलेले हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांना हा प्रकार निदर्शनास आणून देऊन रुग्णालय परिसरात भरविण्यात येणारा बुधवारचा आठवडी बाजार जुन्या ठिकाणी भरविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

या मागणीला प्रतिसाद देत आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी तातडीने उपस्थितांना बाजार पूर्ववत नेण्यासाठी लवकरच नगरपंचायतीचे प्रशासक, मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊ आणि रुग्णांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात ये - जा करताना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डी.डी.गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी संदेश पोहरे, माजी जी.प. सदस्य सुभाष दादा राठोड, सत्यव्रत ढोले, खरेदी विक्री संघाचे संचालक परमेश्वर गोपतवाड, सोसायटीचे चेयरमन गणेशराव शिंदे, कृउबाचे सभापती डॉ.प्रकाश वानखेडे, शहराध्यक्ष संजय माने, माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, सोसायटीचे संचालक सुभाष शिंदे, मुख्याध्यापक गजानन शिंदे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कोमावार, खा.हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार, जेष्ठ पत्रकार असद मौलाना, पत्रकार अनिल मादसवार, दिलीप शिंदे, अनिल नाईक, सुनील दमकोंडवार, कैलास राठोड, हमीद सर, फेरोज कुरेशी, परमेश्वर भोयर, कृष्णा चौधरी, आबाराव पाटील जोगदंड, साहेबराव चव्हाण, पोलीस जमादार अशोक सिंगणवाड, आदींसह अनेक नागरिकांची उपस्थिती होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी