किनवट तालुक्यातील बोरगाव घाटात कार अडवून 07 लाख 70 हजार लुटले -NNL

किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांनी घटनास्थळाची केली पाणी


किनवट।
तीन ते चार अज्ञात लुटेऱ्यांनी रस्त्यामध्ये एम एच 26 बीसी 35 77 या क्रमांकाची कार अडवून कारमधील 07 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम लुटल्याची घटना मौजे बेल्लोरी शिवारातील बोरगाव घाटामध्ये दिनांक 04 एप्रिल 2022 रोजी रात्री सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान घडली आहे.

किनवट तालूक्यातील मौजे बेल्लोरी शिवारातील बोरगाव घाटातील दुसऱ्या वळणावर अज्ञात तीन ते चार लुटेऱ्यांनी रोडवर दगड व मोटर सायकल आडवी लावून कार क्रमांक एम एच 26 बीसी 35 77 या क्रमांकाच्या कारला आडवून कारच्या काचा दगडाने फोडून गाडीमध्ये मिरचीपूड पावडर टाकून गाडीच्या डिकी मधील पांढऱ्या कापडी पिशवीमध्ये ठेवलेले सात लाख 70 हजार रुपये रोग रक्कम व दुकानाचे व प्लॉटचे कागदपत्र असलेली काळी बॅग असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला आहे.

सदरील घटनेवरून मेहरबान रमेश राठोड राहणार सिंदगी मोहपुर यांच्या फिर्यादीवरून माहुर पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज घडलेल्या या गंभीर घटनेची दखल किनवट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांनी घेऊन ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणची प्रत्यक्षपणे पाहणी करून उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांनी त्यांच्या पथकासह तपासाची चक्रे फिरवली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी