नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे हे प्रदिर्घ सेवेनंतर ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत असल्याने कर्मचारी व मित्र मंडळ यांच्या वतीने २९ एप्रिल रोजी छोटेखानी निरोप कार्यक्रम क्षेत्रीय कार्यालय सिडको ६ येथे आयोजित केला होता. अटकोरे यांनी सेवा काळात व क्षेत्रीय कार्यालय सिडको येथे कार्यरत असतांना मालमत्ता धारक यांच्याकडे असलेली थकीत वसुली व चालू वर्षीच्या मालमत्ता कर वसुली व गुंठेवारी सह , नविन नंबर देणे या मध्ये मोठ्या प्रमाणात वसुली कर्मचाऱ्यांच्या साह्याने केली असल्याचे सांगितले,कोरोणा काळात उत्कृष्ट कार्य केले असल्याचे सांगून नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगितले. क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने यावेळी गौतम बुद्ध यांच्यी प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या सोहळ्याचा अध्यक्ष स्थानी कार्यालय अधीक्षक विलास गजभारे, यांच्या सह नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी तथा अध्यक्ष तुकाराम सावंत, रमेश ठाकूर,किरण देशमुख, तिरूपती पाटील घोगरे,राजश्री पब्लिक स्कूल चे दिपक पाटील व क्षेत्रीय कार्यालय चे कर निरीक्षक दिपक पाटील, सुधीर बैस, योगेश क्षिरसागर, वसुली लिपीक मारोती सांरग, सुखदेव जोंधळे, संतोष भदरगे, मारोती चव्हाण, बालाजी लोहगावकर, राजपाल सिंह जक्रीवाले, राजरत्न जौधंळे,प्रभु गिराम,नथुराम चौवरे, संदीप धोंडगे,प्रकाश दर्शने,परबता सुरेवाड, रविंद्र पवळे,प्रशांत चावरे, मिना अडबलवार, मुक्ताबाई धरमेकर, आरकुले शामसुंदर, साईनाथ देऊळगावकर, नरसिंग कुलकर्णी यांच्या सह सेवानिवृत्त कर्मचारी ताटे ऊपसिथीत होते,आभार मारोती चव्हाण यांनी मानले.