नांदेड जिल्ह्यात गेल्या 5 वर्षा पासून शेतकरी व जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. अवधुत पाटील पवार यांच्या कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा दादा राचुरे, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, सुग्रीव मुंडे,अनिल ढवळे यांनी डॉ अवधुत पवार यांची जिल्हा सचिव पदी निवड केली आहे
निवडी नंतर डॉ.अवधुत पवार म्हणाले की आपण सर्वांना सोबत घेऊन नांदेड जिल्ह्यात आम आदमी पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले. डॉ. अवधुत पवार यांचे त्यांचे मित्रमंडळ व सर्व समाज बांधवा कडून अभिनंदन होत आहे.