नांदेडच्या सावित्री महिला मंचच्या वतीने या पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवार दि.1मे 22 रोजी कुसुम सभागृहात, सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सिनेअभिनेते तथा निवृत्त सनदी अधिकारी एकनाथ उर्फ अनिल मोरे हे असणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. टी. एल. माळवतकर यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. अजय क्षीरसागर यांची उपस्थिती असेल.
स.रणजीतसिंघ कामठेकर यांनी सामाजिक क्षेत्रासह अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. विशेषता त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे . स.रणजीतसिंघ कामठेकर यांच्यासह अन्य चौदा जणांना,त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार घोषित करण्यात आला असल्याची माहिती, संयोजिका तथा संचालक सावित्री महिला मंचच्या संचालिका ॲड. अरुणा मॅडम यांनी दिली आहे.