नायगाव। गडगा येथे कै.गणपतराव पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे तर प्रमुख पाहूणे म्हणून, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी विठ्ठलराव कत्ते, मा.जि.प.सदस्य बालाजी बच्चेवार, बालाजीराव एकाळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवाजीराव पन्नासे, प्रा.जीवन चव्हाण, सरपंच प्रतिनिधी बालाजी पवळे, उपसरपंच प्रतिनिधी हनुमान शिंदे, उपसरपंच परमेश्वर पाटील.यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात पो.नि. अभिषेक शिंदे म्हणाले की, दुभाजकावर सांडणाऱ्या रेती व गीट्टी मुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे तरी वाहनधारकांनी रोडवर रेती व गीट्टी दिसताच वाहनाचा वेग कमी करावा, रस्त्यावरील दिशादर्शक फलकांची माहिती, वाहनाच्या वेगमर्यादा, वाहनांना वेगवेगळ्या रंगाचे पट्टे, ऊसगाडी वाहन बैलगाडीला स्टिकर चिटकवून होणाऱ्या अपघाता पासून बचाव करण्यासाठी उपलब्ध साधन समृद्धी व स्टिकर या बाबत जनजागृतीसाठी करण्यासाठी अभ्यासक्रमात समावेश असणे गरजेचे असून कै. गणपतराव पाटील सेवाभावी संस्थेच्या हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे. असेही ते म्हणाले.
कार्यक्रमानंतर रोडवरील वाहन चालकांना रस्ता सुरक्षा माहिती पत्रक वाटपाचा शुभारंभ प्रमुख मान्यवर मंडळी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी मालीपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गिरीधर हात्ते, भास्कर पाटील शिंदे, संभाजी पाटील शिंदे, प्रकाश स्वामी, संदीप पाटील, गोविंदराव हात्ते, भुजंग कोरे, मन्मथ कस्तुरे,आनंदराव कांबळे व कै. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी व गावकरी नागरिक यांची उपस्थिती होती.
प्रारंभी सदर संस्थेचे अध्यक्ष श्रीपत पाटील शिंदे यांनी प्रास्ताविकातून रस्ता सुरक्षा अभियान हा लहान वाहनापासुन ते मोठे वाहन चालवताना नियमांचे पालन करावे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी बैलगाडी रस्त्यावर आणताना बैलाच्या शिंगावर, बैलगाडीच्या जुवावर, पाळण्याच्या पाठीमागे लाल स्टिकर लावून शेतकऱ्यांनी स्वतः काळजी घ्यावी असे आवाहन केले. सुत्रसंचलन बालाजी मालीपाटील यांनी केले तर आभार प्रा.जीवनराव चव्हाण यांनी मानले.