दिड लाखाच्या ऐवज लंपास; दोन दुचाकीवरून तिन आरोपी फरार
अर्धापूर, निळकंठ मदने| नांदेड-अर्धापूर महामार्गावरील दाभड लगत बामणी रस्त्यावर महामार्गापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर तिघांनी पाळत ठेवून एका दुचाकीस्वारास अडवून १ मोबाईलसह दिड लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेवून कॅनल मार्गावरुन दोन दुचाकीवरून तिन आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलीसांनी पाठलाग केला पण आरोपी फरार झाले.मालेगाव जवळील दुचाकीवरून पाठलाग करणारे आरोपी अर्धापूर पोलीसांच्या ताब्यात असूनही ही घटना हे विशेष.
नाबार्डच्या खाजगी बचत गटाची नेहमीप्रमाणे वसुली करण्यासाठी शंकर चिमटे वय (३०) हे सोमवारी सकाळी ११:४० वा.अर्धापूर तालुक्यातील बामणी येथे वसुली करुन दाभडकडे परत येत असताना अर्धापूर- नांदेड या मुख्य महामार्गावरुन केवळ ४०० मीटर अंतरावर तिन आरोपी यापैकी दोन डोक्यावर पगडी परीधान करुन तर एक विना पिढीचा होता.
दोन दुचाकी रस्त्यालगत उभ्या करुन तिघेही अंतरावर रस्त्यावर उभे होते, शंकर चिमटे हे बॅग अडकवून दुचाकीवरून येताच एका आरोपीने आवाज दिला, दुसऱ्या आरोपीने दुचाकी अडविली,तिसऱ्या आरोपीने दुचाकी खाली पाडली,या तिघांनी चिमटे यांना रस्त्याच्या बाजूला नेऊन थाप्पडांनी मारहाण करुन चिमटे यांच्या जवळील रेड मी कंपनीचा मोबाईल व बॅग हिसकावून कॅनल मार्गे टाळ्या रंगाची व लाल पट्टे असलेली पलसर व स्पेंलडर दुचाकी घ्या मागे लव चिन्ह असलेले निनावी नंबरच्या दुचाकीवरून हे तिनं आरोपी शेलगाव रस्त्यावरुन महामार्गावर आले.
केवळ १ कि मी अंतरावर भोकरफाटा येथे असलेल्या पोलीस निरीक्षक अशोक जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिंपळगाव, देगाव (बु),पाथरड त्यांच्या मागावर पाठलाग केला पण आरोपी फरार झाले. भरदिवसा या मार्गालगत ही घटना घडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी शंकर चिमटे यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलिस ठाण्यात तिनं अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,याप्रकरणी पोलिस निरीक्षक अशोक जाधव हे तपास करीत आहेत.
