जनशक्ती संघटना म.रा. नांदेडच्या भोकर विधानसभा उपाध्यक्षपदी चंद्रकांत गव्हाने तर जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षपदी सिमा लोहराळकर -NNL


नांदेड।
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जनशक्ती संघटनेच्या नांदेड जिल्हा महिला आघाडीच्या नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष पदी सिमा लोहराळकर (स्वामी) तर भोकर विधानसभा उपाध्यक्ष पदी चंद्रकांत गव्हाने यांची निवड करण्यात आली असून. निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष उमाकांत पाटील तिडके व जिल्हाध्यक्ष शंकर सिंह ठाकूर यांचे हस्ते देण्यात आले आहे. सदरच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. 
      
महाराष्ट्रात प्रभावशाली संघटना म्हणून नावारूपास येत असलेल्या आणि संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जनशक्ती संघटनेची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा संघटनेचा घटक होण्यासाठी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्त्ये तथा जेष्ठ पत्रकार चंद्रकांत गव्हाने व सिमा लोहराळकर(स्वामी) यांची निवड करण्यात आली आहे. दोघे ही सामाजिक क्षेत्रात मागच्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत, स्त्रियांवरील अन्याय, अत्याचारा विरोधात आवाज उठवणारे व गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे  म्हणून हे दोघेही ओळखले जातात यांची जनशक्ती संघटनेच्या नांदेड महिला आघाडी   उपाध्यक्ष पदी तर भोकर विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असल्याने निश्चितच नांदेड जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी बळ मिळणार आहे. 
    
सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेवून काम करणाऱ्या दोघांच्याही कामाची दखल घेवून संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमाकांत पाटील तिडके व जिल्हाध्यक्ष शंकर सिंह ठाकूर यांनी नांदेड जिल्हा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी तर भोकर विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड करुन नियुक्ती पत्र दिले आहे. संघटनेचे ध्येय धोरणे व शेतकरी, कामगार, निराधार यांचा आधार होण्याबरोबरच  संघटनेची प्रतिमा उंचावण्यासाठी काम करावे अशी अपेक्षा तिडके यांनी व्यक्त केली.यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष शंकरसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष बाळू पाटील शिरफुले, जिल्हा सचिव दिनेश पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे,  हादगाव तालुका अध्यक्ष दादाराव खंदारे, महिला आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष विद्या वाघमारे, महिला आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष रजनी मेडपल्लेवार, बामसेफचे विधानसभा अध्यक्ष जावेद शेख लहानकर, पत्रकार शरद कदम आदी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी