माणसानी माणसासारख राहाव एकमेकाचा आदर करावा, आणि एकमेकाला घेवुन चालणारी महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्राला संताची व महामानवाची शिकवन आहे. म्हणुनच महाराष्ट्रात सण आणि उत्सव गुण्या गोविंदाने साजरे केले जातात, म्हणुनच महाराष्ट्रात राष्ट्रीय एकात्मतेच दर्शन घडते पण स्वताच्या स्वार्थासाठी , धार्मिक वातावर बिघडविण्याचा आणि महाराष्ट्राला अस्थीर करण्याचा कांही राजकिय पक्षाचा डाव आहे की काय अशी भिती आणि शंका निर्मान होऊ लागली आहे. नेते प्रसिध्दीच्या हवेस्यापोटी नको ते प्रश्न उपस्थित करुन मुळ मुद्यापासुन जनतेच लक्ष विचलित करुन आपली राजकिय पोळी भाजन्याचा प्रयत्न केल्याने देशाचा विकास होत नाही. कोणाला काय वाजवाचे ते वाजवा पण भारत देश अखंड ठेवण्यासाठी भोंग्यात भारतीय सविंधान वाजवा.... भारतीय सविधानाचे भोंग्यातुन पठण केल्यास युवा पिढी प्रेरीत होऊन भारत देश हा महासत्ता झाल्या शिवाय राहाणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे.
भारतीय सविंधानाने देशातील प्रत्येक नागरीकाला आपआपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे. भारत हा एकसंघ देश आसला तरी अनेक जातीपंथ धर्म यात विभागला आहे. प्रत्येक जातीच्या धर्माच्या रुढी परंपरा भिन्न भिन्न आहेत पण केंद्रस्थानी महामानव, विश्वरत्न,भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यानी लिहीलेले भारतीय सविंधान आहे. या भारतीय सविंधानाचे प्रगट वाचन सर्वच भारतीय नागरीकानी केल्यास भारतदेश अखंड आणि अधिक मजबुत राहील त्याच बरोबर भारतीय सविधानाने आपनाला कोणते अधिकार दिलेत याची माहीती देशातील प्रत्येक नागरीकांना होयील त्यामुळे भारतीय सविंधानाचे प्रगट वाचन दररोज भोंग्यातुन करणे आता काळाची गरज आहे. आज आपण देश सुधारला म्हणतो, जग सुधारले असे म्हणतो पण देशातील किती लोकांना भारतीय सविंधानाची ईत्यांभुत माहीती आहे. किती जनाना माहीत आहे की, सविधानाने आपणाला काय दिले , देशातील प्रत्येक नागरीकाला भारतीय सविंधानाची ओळख आणि संविधानाने दिलेल्या अधिकाराची माहीती असने व नागरीकाना अधिकाराची माहीती करुन देणे या साठीच भोग्यातुन संविधानाचे वाचन करणे हे आपले कृतव्य आहे. त्याच बरोबर गावा गावात मेळावे घेवुन गावच्या चावडीवर भारतीय सविधानाचे वाचन केल्यास येनार्या पिढीला सविधानाने दिलेले अधिकार समजतील आणि नेत्यांच्या खोटारड्या भाषनाला आणि जातीपातीच्या राजकारणाला जनता बळी पडनार नाही.
आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाईने उच्चांक गाठला आहे. पण या महागाईवर कोणताच राजकिय पक्ष बोलायला तयार नाही. सत्ताधारी असो की विरोधी पक्ष या विषयावर गप्प का आहेत ? या वाढत्या महागाईमुळे नागरीकांचे आर्थिक बजेट कोलमडुन गेले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या या राज्यकर्त्यानी मुळ मुद्दे बाजुला ठेवुन एकमेकावर आरोप प्रत्यआरोप करुन जनतेच लक्ष विचलित करण्याचा जनु काय यानी विडाच उचललेला दिसत आहे. द. कश्मीर फाईल, हिजाब, लाउडस्पिकर या मुद्याला अधिक म्हत्व मिडीया आणि नेते मंडळी देत असल्याचे दिसत आहे. पण देशात पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले, मेडीकल औषदीचे भाव वाढले, खाद्यदार्थाचे भाव वाढले, दाळीचे भाव वाढले, मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली, शेतकरी आत्महात्या करीत आहेत, शेतकरी संकटात सापडला आहे. याकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या राजकिय नेते मंडळीचे लक्ष नाही. कारण जनतेच्या हीताच्या मुद्याला जानुन बुजुन ही राजकिय मंडळी बगल देत आहेत पण वाढलेल्या महागाई विरोधात या राजकिय पक्षाच्या नेते मंडळीना रस्त्यावर उतरायला वेळ नाही. का ? नाही. हा संशोधनाचा विषय आहे. जगातील प्रत्येक देश झपाट्याने प्रगती करीत असल्याचे आपण दररोज वृत्तमान पञातुन वाचत आहोत आणि आपला देश जातीपातीच्या राजकारणात गुरफटलेला दिसत आहे. प्रत्येक राजकिय पक्षानी राजकिय पक्षाच्या हितापेक्षा देशाच हित मोठ समजुन राजकारण केल्यास राजकिय पक्षाच्या प्रगती बरोबर देशाची प्रगती होवु शकते. पण या राज्य कर्त्याना देशापेक्षा पक्ष म्हत्वाचा वाटु लागला आहे.
खासदार आणि आमदार यांना जनतेनी आपल्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा सर्वागिंन विकास होयील ,आपल्या मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागतील ,दळन वळन वाढेल ,रस्ते मजबुत होतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होयील , या भावनेने आमदाराला दोन ते तीन लाख नागरीकानी मतदान करुन विधान सभेत पाठविल्या जाते तर खासदाराला सतरा ते आठरा लाख नागरीकानी मतदान करुन लोकसभेत पाठविल्या जाते. एवढेच नाहीतर गोरगरीब जनतेच्या, कष्ठाच्या घामाच्या पैशातुन सरकारकडे जनता टॅक्स भरते ,करभरते, आणि त्यातुन आमदार आणि खासदार याना पगार दिला जातो. त्याच बरोबर सर्व सुखसोई मोफत दिल्या जातात. हे सर्व गोरगरीब जनतेच्या पैशातुन चांगला हेतु डोळ्यासमोर ठेवुन आमदार आणि खासदारांना पगार दिला जातो तो पगार गोंधळ घालण्यासाठी नाही, जनतेला अडचनित आनण्यासाठी नाही, नको ते प्रश्न उपस्थित करुन जनतेला वेठीस धरण्यासाठी नाही, स्वताच्या विकासासाठी नाही, आपआपल्या सोयर्या धायर्याच्या विकासाठी नाही.
नात्यागोत्याच्या विकासा साठी नाही तर खासदार आणि आमदार या लोकप्रतीनीधीनी मतदार संघाच्या विकासासाठी काम करावे, विकासाची कामे खेचुन आनवीत आणि मतदार संघ सुजलाम सुफलाम व्हावा एवढीच जनतेची अपेक्षा असते. पण मुळ हेतु बाजुला ठेवुन आजचे कांही लोकप्रतिनिधी स्वाताच्याच विकासासाठी, स्वताच्याच फायद्यासाठी आणि प्रसिध्दीसाठी गोंधळ घालताना आपन पाहात आहोत याला कूठेतरी आळा बसला पाहीजे, आणि आशा लोकप्रतिनीधिना जनतेनी त्याची जागा त्यांना दाखवुन दिली पाहीजे. या महाराष्ट्राने अनेक राजकारणी नेते पाहीले आहेत. ते विकासाच्या मुद्यावर भांडताना या महाराष्ट्राला परीपक्व राजकारणाची परंपरा आहे. पण आज नेते मंडळी शेता शिवाराची भांडणे भावा भावात लागावित असे वर्तनाची भांडने सत्ताधारी आणि विरोधी पक्षात होत आहेत जनतेच्या विकासाचा मुद्दा, वाढलेल्या महागाईचा मुद्दा बाजुला ठेवुन एकमेकाचा सुड घेने या वृतीने नेते मंडळी राजकारण करीत असल्याचे दिसत आहे. यामूळे देशाचा विकास होत नाही. हे काम नव्हे यर्या गबाळ्याचे येथे पाहीजे रे जाती चे असे म्हणटले तर वावगे ठरनार नाही...............
पञकार प्रल्हाद दे. आगबोटे, कंधार जि. नांदेड, मो. ९५६१९६३९३९