बिलोली देगलूर विधानसभा मतदार संघात आय ए एस आणि आय पी एस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. बिलोली येथे आयपीएस अधिकारी श्रीयुत अर्चीत चांडक हे रुजू झाले आणि कामाला सुरुवातही केली वर्तमान स्थितीत ते प्रशिक्षणासाठी बाहेरगावी असले तरी ते बिलोली येथे पोलीस विभागाचा कार्यभार सांभाळणार आहेत. देगलूर विधानसभा मतदारसंघात बिलोली आणि देगलूर हे दोन्ही तालुक्याचा समावेश आहे.
देगलूर येथे कार्यरत असलेले श्रीयुत शक्ती कदम यांच्या ठिकाणी सौ. शर्मा या आय ए एस अधिकारी रुजू झाले आहेत. बिलोली आणि देगलूर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. याच बरोबर अवैध धंद्या नाही उत आला आहे. अशात बिलोली येथील आयपीएस अधिकारी अर्चित चांडक आणि देगलूर येथील आय ए एस अधिकारी सौम्या शर्मा या आपल्या कार्याची आणि प्रामाणिक कामाची चुणूक दाखवतील अशी आशा आणि अपेक्षा सीमावर्ती भागातील जनतेतून व्यक्त होत आहे.
या दोन अधिकार्यामुळे पोलीस आणि प्रशासनावरील विश्वास वाढेल असे मत सीमावर्ती भागातील प्रमुख समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर यांनी व्यक्त केले आहे. वर्तमान स्थितीत बिलोली येथील पोलीस आणि प्रशासनावरील जनतेचा विश्वास लुप्त झाला आहे. देगलूर येथील शक्ती कदम यांनी प्रभावी काम करण्याचा प्रयत्न केले असले तरी सौ शर्मा या अधिक प्रभावी आणि कठोर व गतिशील काम करतील असे मत व्यक्त होत आहे.