यासाठी गावस्तरावर स्वच्छता, नागरी सुविधा, नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, दुर्लक्षित घटक, सामाजिक क्षेत्रातील कामगिरी, आपत्ती व्यवस्थापन, उत्पादन वाढीकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम, ग्रामपंचायतीला विकसित करण्यासाठी स्वच्छेने काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, ई-गव्हर्नर्स आदीबाबत ग्रामपंचायतीने कामे केली आहेत.
झरी ग्रामपंचायतीला पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच द्वारकाबाई रिंगे, उपसरपंच अशोक जाधव, विलास रिंगे, ग्रामसेवक डी. बी. लाटकर यांचे बुके देऊन सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, गट विकास अधिकारी शैलेश वावळे, विस्तार अधिकारी डी. आय. गायकवाड, धनंजय देशपांडे आदींची उपस्थिती होती.
यापूर्वी झरी ग्रामपंचायतीला केंद्रशासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा पुरस्कार, अंगणवाडीला विभागीय स्तरावरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी पुरस्कार, राज्यस्तरीय यशवंत पंचायत राज पुरस्कार, राज्य शासनाचा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळालेला आहे. आता पंडित दीनदयाल पुरस्काराची भर पडली आहे. ग्रामपंचायतीला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.