वसमत रोडच्या पेट्रोल पंपाची कॅश लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अर्धापुर पोलीसांकडून अटक -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
दि.14 मार्च रोजी पद्मावती पेट्रोल पंपाचे मॅनेजर दादाराव अशोक हाके यांनी मागिल चार दिवसाची पेट्रोल पंपावर जमा झालेली कॅश मालेगांव येथील बँकेत जमा करण्यासाठी जात असतांना सकाळी 10.00 वाजताचे सुमारास धामदरी पाटीजवळ पाठीमागुन एका मोटार सायकल वर तिघे जण आले आणि तोंडाला कपडा बांधलेले त्या अज्ञात चोरट्यानी दादाराव हाके यांचे मोटार सायकलला पाठीमागुन लाथ मारुन त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचे जवळ असलेली पेट्रोल पंपाचे 9 लक्ष 54 हजार 220  रुपये जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पोलीस ठाण्यात दाखल गुण्याच्या अनुषंगाने शोध घेतला असता आज अर्धापुर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

वसमत रोडच्या पद्मावती पेट्रोल पंपाची कॅश लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या विरोधात पोलीस स्टेशन अर्धापुर येथे गुन्हा रजि.नं. 60/2022 कलम 393 भारतीय दंड संहिता प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या घनतेनंतर पोलीस अधिकांश प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक भोकर विजय कबाडे, व उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अर्चना पाटील, यांनी सदर गुन्हयात आरोपी शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करुन अर्धापूर पोलिसांना सुचना दिल्या होत्या. त्यावरुन पोलीस स्टेशन अर्थापुरचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी स्वतः गांभीर्याने व तत्परतेने घटनास्थळाला भेटी देऊन गोपनिय माहिती घेतली.

आणि त्यांनी स्वतः गुप्त बातमीदार नेमुन उपलब्ध खात्रीशिर माहितीचे आधारे दिनांक 30.03.2022 रोजी माहिती घेतली असता सदर आरोपी हे हिंगोली जिल्हयातील वसमत तालुक्‍यात कंरजी येथे असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली त्यावरुन बोलीस स्टेशनचे दोन वेगवेगळे पथक तयार करुन पोलीस स्टेशन अर्धापुर येथील पोलीस निरीक्षक अशोक जाधव, 'पोलीस उप निरीक्षक कपिल आगलावे, पोलीस उप निरीक्षक, साईनाथ सुरवसे, पोलीस नाईक राजेश घुत्रर, पोलीस नाईक संजय घोरपडे, होमगार्ड- दिपक बल्लोड, होमगार्ड-सर्जेराव मुंगल हे सर्वजण त्या ठिकाणी गेले असता आरोपी हे पोलीसांना पाहुन पळ काढत होते. त्यांचा पाठलाग करुन पाच आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता संशयीत सर्जेराव रोहिदास होळपदे वय 22 वर्ष रा.कंरजी ता.वसमत, देवानंद उर्फ़ लखन पि.बालाजी दुधमागरे वय 21 वर्ष रा.खांडेगांव ता.वसमत, पवन माणिकराव डाकोरे वय 21 वर्षरा. पळसगांव ता वसमत, गोविंद उर्फ़ अतुल रमेश तुरेराव वय 23 वर्ष रा.खांडेगांव, राजु एकनाथ चव्हाण रा.खांडेगांव ता.वसमत याना अटक केली. या संशयीतांना ताब्यात घेवुन त्यांचे कडे गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी मालेगांव ते वसमत रोडवर पद्मावती पेट्रोल पंपाचे 9,54,220/-रुपये जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगत,गुन्हयात वापलेल्या दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या.

तसेच सदर गुन्हयातील आरोपीतांना विचारपुस केली असता त्यांनी 1) पोलीस स्टेशन लिंबगांव हद्दीतील निळा येथील वैशालीताई पावडे हया पेट्रोल पंपावर जबरी चोरी केली 2) पोलीस स्टेशन आसेगांव जि.वाशिम हद्दीतील बिटोळा भोयर येथील आंनदी हया पेट्रोल पंपावर जबरी चोरी केली 3) पोलीस स्टेशन मानवत हद्दीतील रूद्री पाटी जवळ कैलास हया पेट्रोल पंपावर जबरी चोरी केली 4) पोलीस स्टेशन महागांव हद्दीतील पेट्रोल पंपावर जबरी चोरी केली तसेच वरिल सर्व पेट्रोल पंपावर जबरी चोरी करुन फरार झाल्याचे सांगितले. आणि वरील गुन्हे केल्याची कबुली दिली. 

हि दमदार कामगीरी प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक,नांदेड, विजय कबाडे,अपर पोलीस अधिक्षक भोकर, श्रीमती अर्चना पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी उपविभाग भोकर नांदेड ग्रामिण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोलीस उप निरीक्षक कपिल आगलावे, पोलीस उप निरीक्षक, साईनाथ सुरवसे, पोलीस नाईक राजेश घुन्नर, पोलीस नाईक संजय घोरपडे, होमगार्ड-दिपक बल्लोड, होमगार्ड-सर्जेराव मुंगल यांनी पार पाडली. सादर कामगिरीबद्दल प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक व विजय कबाडे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांनी सदर कामगीरीचे कौतुक केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी