पण यातून काँग्रेसचा लिंगायत समाजाला गोंजारण्याचा केविलवाणा प्रयत्न चुकीचा- भाजपा नेते रामदास पाटील सुमठाणकर
शहरात आणी ग्रामीण भागात वीरशैव लिंगायत समाज बहुसंख्य आहे.यामुळे नांदेड शहरात पूर्णाकृती पुतळा असावा यासाठी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभारून संघर्ष केला गेला हा इतिहास आहे.. कृती समितीने आंदोलन केले. यावेळी अक्षरशः लाठी चार्ज केला गेला. समाजातील अनेक वीर ह्या लाठीचार्जमध्ये जखमी झाले.या समितीचे अध्यक्ष कै.प्रकाश कौडगे, इतर सुभाशिष कामेवार, शिवप्रसाद सोनटक्के,गिरीश नारखेडे,नागनाथ स्वामी ,नवीन कौडगे, हनुमंत पटने, तातेराव वाकोडे* हे अक्षरशः जखमी झाले होते.
त्यात इतर अनेक समाजाच्या संघटना समाविष्ट होऊन मोठं योगदान त्या संघटनेनी मोठं योगदान दिलं.. पण आज काँग्रेस पक्षाने यांचं योगदान विसरून खाजगी कंपनी सारखं अनावरण सोहळा आयोजित केले आहे. खरा तर हा कार्यक्रम महानगरपलिका ने साजरा करायला हवे असताना, केवळ काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पत्रक काढून प्रचार आणि प्रसार करताना दिसत आहेत.
ह्या पत्रकावर राष्टसंत यांचा साधा फोटो टाकला नाही हे अतिशय चुकीचे आहे.आणि यावर आपल्या नेत्याच् नको तेवढं गुणगान गायलेलं आहे.. निवडणूक आली कि राष्ट्रसंतांच्या पायावर लोळण घेणारे यांना आज विसर पडावा हेच खेदजण्य आहे.
काँग्रेस पदाधिकारी गावोगावी जाऊन लोकांना अनावरण कार्यक्रमाला येण्याचे आवाहन करताना विविध सोसिअल मीडियावर दिसत आहेत. त्या बैठकिला केवळ काँग्रेसचे पदाधिकारी यांची उपस्थिती दिसत आहे..म्हणजे लिंगायत समाज हा कोण्या एका पक्षाची खाजगी मालमत्ता नाही आणि महात्मा बसवेश्वर तर कदापि नाहीत.. तर महात्मा बसवेश्वर हे सर्व अखंड भारतीय समाजाचे दैवत आहेत, समतेचे नायक आहेत..त्यामुळं काँग्रेस ने त्यांना विशिष्ट चौकटी मध्ये बसवू नये.
काँग्रेसला आज येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका आणि समाजातील काही संघटना यांनी 25 एप्रिल ला अनावरण करण्याची दिलेलं अल्टीमेटम यामुळे दमछाक करून धावपळीत कार्यक्रम उरकण्याची घाई लागली आहे. नांदेड शहरत काँग्रेस कडे 40 वर्ष सत्ता असताना म्हतमा बसवेश्वर पुतळा उभरायला 40 वर्ष लागले यावरून काँग्रेसच लिंगायत समाजाप्रती असलेली भावना समाजाच्या लक्षात आलेली आहे.
वीरशैव लिंगायत समाजातील सर्व जातींना सरसकट ओबीसी आरक्षण, सारथी सारखी संस्था उभारणी, मंगळवेढा येथे महात्मा बस्वेश्वर स्मारक उभारणी, आर्थिक विकास महामंडळ इत्यादी अनेक विषय आज राज्य शासनाकडे प्रलंबित असताना याकडे राज्यातील महाविकास आघाडी शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळं लिंगायत समाजाने काँग्रेस च्या या भूल भुलया ला बळी पडू नये. परंतु ,जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे समस्त लिंगायतचे अभिमान असल्याने नांदेड जिल्हा आणि परिसरातील समाजाबांधव, लहान थोर, माता भगिनी, धर्मगुरू , कीर्तनकार, शिव संप्रदाय यांनी उद्याच्या अनावरान सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती राहून हर्ष उलासितपणे अनावरण सोहळा साजरा करावा असं भारतीय जनता पार्टी तर्फे सर्व समाज बांधवाना विनंती करतो...