छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर यांचा इशारा
नांदेड| नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू व मुरूमाची तस्करी महसुल प्रशासनाच्या आर्शिवादाने होत आहे. यासह गुटका-मटका या अवैधधद्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे. यावर त्वरित कडक कार्यवाही करून नांदेड अवैध धंदे मुक्त करा, अन्यथा रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर यांनी दिला आहे.
नांदेड जिल्हा हा गेल्या अनेक वर्षापासून वाळु-मुरूमाची तस्करी, अवैध गुटखा, मटका, गावठी दारू, विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगणे केवळ आणि केवळ बाहेरून आलेले परराज्यातून बिहारी लोक यास जिम्मेदार आहेत, अशी शंका आहे. अशा अनेक घटनाने नांदेड शहरातील जनता, व्यापारी, उद्योगपती त्रस्त झाले आहेत. यावर जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाची वचक राहिली नसल्याचे दिसून येते. कायदा व सुव्यवस्था टिकवायची असेल तर या सर्व अवैध धंद्यांना त्वरित बंद करून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे. बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या हत्येने शहर हादरले आहे. नांदेड शहरात तत्कालीन पोलिस अधीक्षक व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण, रवींद्र सिंघल, चंद्रकिशोर मिना यांची गुन्हेगारांवर असलेली वचक आजही हवी आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये येथे रेती तस्करी रोखण्यासाठी चौकी स्थापन करण्यात आली. मात्र, या चौकशी वापर होत नसल्याने शासनाची फसवणूक प्रशासनाकडून होत आहे. दररोज हजारो ब्रास रेतीची सर्रासपणे उपसा होत असून, याकडे महसूल प्रशासन आर्थिक संबंधामुळे गप्प असल्याचे दिसून येत आहे. याला फक्त महसूल प्रशासन जबाबदार आहे. शहरातील सर्वच चौकामध्ये, गल्ली बोळामध्ये मटका सर्रासपणे सुरू आहे. पोलिस प्रशासनाला याची माहिती असतांनाही ते यावर कार्यवाही करीत नसल्याने शंका निर्माण होत आहे.
जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने कार्यवाही करून सर्व अवैध धंदे बंद करावे आणि जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर यांनी केली आहे. ही कार्यवाही होत नसेल तर माफीयांना आपल्या स्टाईलने रस्त्यावर उतरून धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर यांनी दिला आहे.