नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषध निर्माणशास्त्र संकुलामध्ये कॅम्पस मुलाखती पार पडल्या. यामध्ये लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे एकूण ३५ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. बी.फार्म, एम फार्म, एम.एस्सी, बी.एस्सी, व एम.बी.ए. विद्यार्थ्यांच्या कॅम्पस मुलाखतीसाठी फ्लेमिंगो फार्मास्युटिकल्स लि. कृष्णूर, एम. आय. डी.सी. ही औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी आलेली होती. या कंपनीद्वारे लेखी परीक्षा व मुलाखती घेऊन एकूण ३५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली औषधनिर्माणशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. शैलेश वाढेर व संकुलातील प्रशिक्षण व व्यवसाय रोजगार प्रभारी अधिकारी डॉ. शशिकांत ढवळे,
सहा. प्रा. निशा दरगड, वर्षा कदम, वैशाली शेळके, रीना पवार, निशा केंद्रे, प्रिया देशमुख, भगवान सुपेकर यांच्या सहकार्याने फ्लेमिंगो फार्मास्युटिकल्स कंपनी करिता गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पार पाडली. या कंपनीचे पदाधिकारी प्रविण घुले, ऋषी चौरासिया, अनिल शेलगांवकर, निलेश कुलकर्णी व अशोक पब्बावार यांनी उमेदवारांची निवड मुलाखती घेतल्या. परिश्रमकतेने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे यांनी अभिनंदन केले.