कंधार| तालुक्यातील मौजे मरशिवणी येथील महिला लक्ष्मीबाई बालाजी गिरी(वय ६७) यांचे बुधवार दि.१३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मौजे मरशिवणी येथे त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मरशिवणी ग्रामपंचायतीचे सदस्य तथा पत्रकार वैजनाथ गिरी यांच्या त्या मातोश्री होतं