नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने ३१ मार्च २२ अखेर विशेष वसुली केलेल्या करनिरीक्षक , लिपीक यांच्या सत्कार १ एपिल रोजी मनपा मुख्यालयात आयुक्त डॉ सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त शुभम केतमवाड, मुख्यलेखाधिकारी अश्विनी नराजे, सहाय्यक आयुक्त पंतगे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संजय जाधव, अविनाश अटकोरे,बेग, डॉ.रईसोधदीन, रमेश चवरे,रावण सोनसळे.
यांच्या मार्गदर्शनाखाली सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता करापोटी विशेष वसुली अभियान अंतर्गत वसुली करणाऱ्या सिडको झोनचे सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी मार्च २२ अखेर २कोटी ६१ लक्ष रुपये वसुली करणाऱ्या कर निरीक्षक सुधीर बैस, व प्रभागात जास्तीत जास्त वसुली करणाऱ्या लिपीक ,दिपक पाटील,संदीप धोंडगे, मारोती सांरग,मालु एनफळे, यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गतवर्षी चा तुलनेत या वर्षी या झोनने जप्ती करून विशेष वसुली केली आहे.