नांदेड| राजपूत भामठा, परदेशी भामटा समाजाच्या जात प्रमाणपत्र पी व पडताळणी साठी येणा-या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी समाजाच्या सर्व संघटनांनी मिळून बनविलेल्या अभ्यास गटात नांदेड येथील अ.भा. क्षत्रिय महासभेचे जिल्हाध्यक्ष पवनसिंह बैस निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकतीच राजपूत भामटा । परदेशी भामटा समाजाची ठाणे येथे माजी मंत्री जयकुमारजी रावल यांच्या अध्यक्षतेखाली व आ. किशोरअप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजाच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधिची बैठक घेण्यात आली. भामटा राजप्र्त, परदेशी भामटा राजपूत जात प्रमाणपत्र व पडताळणीमध्ये निर्माण होणा-या अडचणी समजून याबाबत कार्यरत असणा-या जागृत अभ्यासू घटकांनी कायदा, नियमाच्या चौकटीत व वस्तुनिष्ठ परिस्थिती आणि त्यासाठी आवश्यक कार्यवाहीची गरज प्रकर्षाने निदर्शनास आणून दिली.
यासाठी राज्यस्तरावर अभ्यासू गठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभ्यासगट समितीच्या कार्याध्यक्षपदी नाशिक येथील प्रा. सज्जनसिंह पवार यांची तर सरचिटणीस पदी जालना येथील प्रा. डॉ. भगवानसिंह डोभाळ, बुलढाणा येथील मधुसूदन पाटील यांची, समन्वयक सुभाष महेर औरंगाबाद यांची, प्रवक्ते म्हणून तर औरंगाबाद येथील आनंदसिंह बैस, अँड भगतसिंह राजपूत सांगली यांची कायदेशिर सल्लागार म्हणून निवड केली आहे.
या समितीच्या सदस्य पदी प्रा.आर.जे.राजपूत महेंद्रसिंह सुर्यवंशी, परसराम बहुरे, गिरीषसिंह परदेशी, विनायक शिलेदार याच्यासह निमंत्रीत सदस्य म्हणून नाशिकचे राजेंद्रसिंह चौहान, नांदेडचे पवनसिंह बैस, धुळे / जळगांव येथील जसपालसिंघ सिसोदिया, मुंबईचे राजेशसिंह सोलंकी, सांगली पी.एल. राजपूत, मालेगांवचे आनंदसिंह ठोके, कल्याणचे सुभाषसिंह राजपूत, तलोदा- जि. नंदूरबारचे श्याम राजपूत, दैठणा-परभणीचे विलास कच्छवे, नागपूरचे पंकजसिंह ठाकूर, आदी.ची निवड करण्यात आली आहे.