नांदेड ग्रामीण हद्दीमध्ये कोबींग ऑपरेशन मोहिम राबवून विशेष कार्यवाही केली
नांदेड| पोलीस स्टेशन इतवारा, नांदेड ग्रामीणचे हद्दीमध्ये कोबींग ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली. दरम्यान चौफाळा, नावघाट, मरघाट, कौठा, प्रितमनगर भागामध्ये विशेष कार्यवाही दिनांक १२ एप्रिल रोजी करण्यात आली आहे. तर बेकायदा हत्यार बाळगून आल्या प्रकरणे ३ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदेड शहारातील पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरील ४९ गुन्हेगार चेक करण्यात आले व आर्म ऍक्ट प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष मोहिमे दरम्यान पोलीस स्टेशन वजिराबाद यांनी रेकॉर्डवरील ०९ आरोपी चेक केले, पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांनी रेकॉर्डवरील ०५ आरोपी चेक केले, पोलीस स्टेशन भाग्यनगर यांनी रेकॉर्डवरील ०४ आरोपी चेक केले असुन एक भा.ह.का कायदया प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला, पोलीस स्टेशन विमानतळ यांनी रेकॉर्डवरील ०८ आरोपी चेक केले असुन एक भा.ह.का कायदया प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला, पोलीस स्टेशन इतवारा यांनी रेकॉर्डवरील १३ आरोपी चेक केले, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांनी रेकॉर्डवरील १० आरोपी चेक केले.
एक भा.ह.कायदया प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. शहरामध्ये बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक,नांदेड यांनी पोलीस निरीक्षक विमानतळ, भाग्यनगर, शिवाजीनगर चे प्रभारी अधिकारी पोस्टेचे डी.बी.पथकाचे अधिकारी व कर्मचारी तसेच आर.सी.पी. पथक यांचे मदतीने विशेष मोहिम राबवुन आनंदनगर, पवार टी हाऊस, चौफाळा या भागात बेशिस्त लावलेले अकरा वाहन डिटेन करण्यात आले. तसेच रेसिंग बाईक,विना नंबर प्लेट बाईक यांचेवर मोटार वाहन कायदया प्रमाणे कार्यवाही करुन ३५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
भाग्यनगर पोलीस ठाणे अंतर्गत दि.१२ रोजी १९.२० वाजेचे सुमारास, कल्याणनगर मराठा दरबाराचे बाजुला नांदेड, येथे यातील आरोपी नामे 1) शुभम शिवाजी जाधव वय २३ वर्षे रा. जयप्रकाश नगर आर्सजन, 2) शुभम प्रेमससागर दगडे वय २२ वर्षे रा. रेडी मंगल कार्यालयाचे बाजुला मालेगाव रोड नांदेड, 3) प्रमोद गणतराव धनंजय वय २६ वर्षे रा. शिवरोड मुळे नगरी तरोडा बु. नांदेड, 4) शंकर अमृतराव मुळे वय २४ वर्षे रा. कल्याण नगर मराठा दरबारचे बाजुला नांदेड या आरोपीतांनी विनापरवाना बेकायदेशीर रित्या एक लोखंडी तलवार किमत अं. ८००/- रुपयाची ताब्यात बाळगलेले मिळुन आले यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमानतळ पोलीस ठाण्यांतर्गत दि.१२ एप्रिल रोजी ०१.४०वाजेचे सुमारास, आरोपीचे राहते घर गुरुनगर, नांदेड,येथेयातील नमुद आरोपीनामे गणेश आमरसिंह ठाकुर वय २३ वर्षे रा. गुरुनगर नांदेड विनापरवाना बेकायदेशीर रित्या एक लोखंडी खंजीर किमत अं. १०००/- रुपयाचे ताब्यात बाळगलेला मिळुन आला वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत दि.१२ एप्रिल रोजी १७.३० वाजेचे सुमारास, ढवळे कॉर्नर ते चंदासिंग कॉर्नर जाणारे रोडवर ढवळे कॉर्नर,नांदेड येथे यातील नमुद आरोपी नामे 1) गणेश भुजंग मोरे वय २० वर्षे 2) कृष्णा दिपक डोमपल्ले वय २२ वर्षे दोघे रा. शाहुनगर वाघाळा नांदेड आरोपीतांनी विनापरवाना बेकायदेशीर रित्या एक लोखंडी खंजर ताब्यात बाळगलेला मिळुन आले. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही विशेष पोलीस महानिरीक्षक, परिक्षेत्र नांदेडचे निसार तांबोळी, नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा सिध्देश्वर भोरे, व सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे विशेष पथक, आर.सी.पी. पथक यांनी कार्यवाही केली. अशी माहिती जनसंपर्क अधिकारी पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड यांनी जारी केली आहे.