ऊस नेताका...? ऊस -NNL


कारखाना प्रशासनाचे शून्य व्यवस्थापन आणि मनमानी कारभारामुळे १६ महिने लोटूनही तोडणी अभावी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात उस उभा आहे. उसाचा कार्यकाळ संपूनही ऊस वावरातच असल्यामुळे खरिपाच्या तयारीची सुरुवात झाली असतं शेतकरी मटार चिंतेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ऊस तोडणी लांबत असल्याने उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय क्षेत्र रिकामे होत नसल्यामुळे इतर पिके शेतकऱ्यांना घेता येत नाहीत. सध्या (Sugarcane) ऊसाला तुरे आले असून  ऊस वाळत आहे आता वजनात घट झाली तर केलेला खर्चही पदरात पडतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारखान्यांचे नियोजन बिघडले असून आता शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.  कारखान्यांकडे नोंदी केल्या आहेत. त्यामुळे प्रश्न अधिकच बिकट होत आहे.

यामुळे रखडत आहे ऊसाची तोडणी

सर्व च ऊस एकाच वेळी तोडणीला आलेला आहे.  त्यामुळे मजूराच्या सहायानेच ऊस तोडणी लवकर होत नाही कोणताही पर्याय उरलेला नाही. कारखान्याकडून वेळेवर मजूरांचा पूरवठा होत नाही. ऊसतोड कामगारांची कमतरता भासत असून वेळेवर मजूर येत नसल्याने उसाला तुरे फुटले आहे. मजूर वाहतूक मालक शेतकऱ्यांची अक्षरशा लुट करत आहेत तसेच यामुळे ऊसाचे वजन घटून नुकसान होणार असल्याने ऊस उत्पादकांचा झालेला खर्च देखील निघणे यामुळे मुश्कील होणार आहे. तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत.

अतिरिक्त ऊसाची काय आहे स्थिती...? 

लागवडीपासून किमान 12 महिन्यात ऊसाचे गाळप झाले तर वजनही योग्य मिळते आणि साखरेचा उताराही चांगला मिळतो. त्यामुळे वेळेत तोड मिळावी ही शेतकऱ्यांची भूमिका राहिलेली आहे. परंतू, वेळेत तोड न झाल्यास ऊस पोकळ होण्यास सुरवात होते व त्यामधील ग्लुकोज व फ्रुक्टोजचे विघटन होत साखरेत रुपांतर होते. त्यामुळे साखरेचा उतारा हा कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह संबंधित साखर कारखान्याचे नुकसान होतेच. शिवाय तोडणीला येऊनही दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटला तर मात्र, ऊस फडातच राहणार अशी भीती असते.

कारखाना प्रशासनाचे दुर्लक्ष 

ऊस लागवडीच्या नोंदी ह्या साखर कारखान्याकडेही असतातच. मात्र,  स्वार्थ पणा दिसत आहे तसेच  सहकारी तत्त्वावर आधारित कारखाना नसल्याने कारखाण्याची एकधीकार शाही चालत आहे सर्व कारखाने वाहतूक मालक यांच्या  आधारे चालत आहेत तसेच साधण्यासाठी कारखान्याचे  हे लगतच्या भागातील शेतकऱ्यांचाच ऊसतोडणीला प्राधान्य देतात. लागवडीनंतर 12 महिन्यामध्ये ऊसाचे गाळप होणे गरजेचे आहे. अन्यथा वजनाबरोबर साखरेच्या दर्जावरही त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे वेळेत तोड झाली तर शेतकऱ्यांचा फायदाही आहे आणि क्षेत्र रिकामे होऊन इतर पीकही घेता येते. मात्र, कारखाना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे....

कल्याण पाटील वानखेडे, पळसपूर, ता.हिमायतनगर जी.नांदेड.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी