लायन्स प्रांतपालपदी सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम जयपुरीया यांची बिनविरोध निवड -NNL


नांदेड|
सिल्व्हासा गुजरात येथे झालेल्या प्रांतीय अधिवेशनात वर्ष २०२२-२३ साठी लायन्स प्रांतपाल म्हणून प्रसिध्द उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम जयपुरीया यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांचे विद्यमान प्रांतपाल दिलीप मोदी, प्रांत सचिव डॉ. विजय भारतीया, सीए गौरव  भारतीया, रिजन चेअरपर्सन योगेश जयस्वाल व रिजन सेक्रेटरी तथा लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

जगातील सर्वात मोठी सामाजिक संस्था असल्याचा मान प्राप्त झालेली संस्था लॉयन्स क्लब इंटरनॅशनल ज्यामध्ये २०० देश असून १४ लाख ५० हजार सदस्य आहे . डिस्ट्रीक्ट ३२३४ एच -२ चे प्रांतीय अधिवेशन दि . ९ व १० एप्रिल २०२२ रोजी संपन्न झाले.डिस्ट्रीक्ट कॉन्फरन्समध्ये ५०० लॉयन्स पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती होती. या प्रांतात विदर्भ , मराठवाडा , खान्देशच्या ८५ क्लब ज्यामध्ये ४००० सदस्य आहेत.अतिशय नयनमनोहर झालेल्या या सोहळ्याच्या  अध्यक्षस्थानी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर दिलीप मोदी होते . तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये लॉयन्स क्लब इंटरनॅशनलचे डायरेक्टर व्ही . के . लडीया , लॉयन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी डायरेक्टर डॉ . नवल मालु , राजु मनवानी , नरेंद्र भंडारी , तसेच मल्टीपल कौन्सील चेअरमन विवेक अभ्यंकर यांचा समावेश होता.लॉयनच्या नियमाप्रमाणे कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. 

तद्नंतर सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली . निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर डिस्ट्रीक्ट गव्हर्नर म्हणुन पुरूषोत्तम जयपुरीया जालना , व्हाईस डिस्ट्रीक्ट गव्हर्नर म्हणून सुनिल देसरडा औरंगाबाद , गिरिष सिसोदीया जलगांव खान्देश यांची अविरोधपणे निवड करण्यात आली . तद्नंतर डिस्ट्रीक्ट २०२२-२३ चे गव्हर्नर पुरुषोत्तम जयपुरीया यांनी आपल्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करून त्यांना सन्मानपूर्वक व्यासपिठावर बोलावुन पुढील वर्षाची रूपरेषा आखून आपआपल्या पदाची जबाबदारी सोपविली. 

दिनांक २४ जून ते दि . ३० जून २०२२ मॉन्टेरियल कॅनडा येथे जागतिक स्तराच्या मान्यवरांच्या तसेच ४० हजार सदस्यांच्या उपस्थितीत २०० देशाचे ७५२ डिस्ट्रीक्ट गव्हर्नर या आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत . त्यामध्ये डिस्ट्रीक्ट ३२३४ एच -२ च्या पुरुषोत्तम जयपुरीया यांचा सुध्दा शपथविधी संपन्न होणार आहे . पुरुषोत्तम जयपुरीया यांचा डिस्ट्रीक्टचा स्लोगन क्रॉस द लाईन असा त्यांनी ठेवला आहे . बिनविरोध  निवड झालेल्या पुरुषोत्तम जयपुरीया,सुनिल देसरडा  , गिरिष सिसोदीया यांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी