हदगाव तालुक्यात जंगलीजीव झाले पाण्यासाठी व्याकुळ.पाण्यासाठी गावाभोवती फे-या -NNL

पाणवठे कोरडे .वन्यजीवांवर शिका-यांचा डोळा ...!


हदगाव, शे.चांदपाशा|
सध्या हदगाव तालुक्यातील वनपरिक्षेञ विभाग हदगाव ने हे वन्यजीव करिता पिण्याच्या पाण्याची तरी जंगलात व्यवस्था करावी कारण जगली जीव सैरभैर झाले असुन, पाण्याच्या शोधात गावाकडे शहराच्या आसपास फे-या मारतांना दिसुन येत आहे. या बाबतीत हदगाव शहरातील  वनपरिक्षेञ कार्यालय मध्ये भेट दिली असता बहुतांशी कर्मचारी हे कार्यालयाच्या झाडाखाली तर काही कार्यालयाच्या पंख्याच्या हवेत कामकाज करतांना दिसुन आले.

वनपरिक्षेञ आधिकारी कुठं आहेत तर ठरलेल उतरे ऐकवायास मिळाली सध्या उन्हाचा पारा वाढलेला असुन मिळालेल्या माहीती प्रमाणे वनपपरिक्षेञ हदगाव तालुक्यातील  जंगलातील  वनविभागाचे पाणवठे सुकल्याने जंगलातील वन्यजीव तप्त उन्हामुळे जंगलातील प्राणी पिण्याच्या पाण्याच्या शोधात गाव व शहराकडे धाव घेत आहेत. अनेक गाव शहराच्या भोवती या प्राण्याच्या फे-या वाढलेल्या आहेत यातुन या वन्यजीवाच्या शिकार होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. हदगाव तालुक्यात वनपरिक्षेञात जंगल बरेच आहे ते किती आहे. याबाबतीत कार्यालयात माहीती मिळत नाही पण बहुसंख्य हरिण रोही मोर ससे रानडुक्कर आदी वन्यजीवांचा आधिवास मोठ्या संख्येने दिसुन येते एप्रिल महीण्यात सुर्य आगओकत आहे. तापमान ४२अंशापार गेल्याने या वन्यजीवाचे पाण्यासाठी व्याकुळ झालेले आहे.

हदगाव वनपरिक्षेञ किती वनविभागाने किती कृञिम पाणवठे  तयार केले या बाबतीत काहीच माहीती मिळत नाही पण कार्यालयाच्या रिकार्डवर हे कृत्रिम पाणवठे असल्याची माहीती आहे. विशेष म्हणजे ह्या पाणवठ्यात पाणीच नसल्याने हे वन्यजीव शहराकडे धाव घेत आहेत अस दिसुन येत आहे. या बाबतीत वनपरिक्षेञ अधिकारी शहरातील कार्यालय मध्ये हे कधी येतात कधी जातात याबाबतीत काहीच माहीती मिळत नाही मिळाले माहीती नुसार तालुक्यात तामसा सर्कल मनाठा सर्कल मध्ये घनदाट जंगल आहे.

या भागात वन्य प्रण्याचा मोठ्या प्रण्याचा वावर असतो उन्हाळा सुरु झाला की शिकारी सक्रिय होतात ससे हरिण रानडूक्कर मोर हे वन्यजीव या शिका-याचे टार्गेट असते. अश्या प्राण्याच्या मांसाला मोठ्याप्रमाणांत मागणी असते. त्यामुळे वनविभाग या बाबतीत जनजागृति किंवा गावकरीचा समन्वय चा अभाव असल्यानेच वन विभागाच्या डोळ्यांत धुळ झोकुन शिकारी आपला डाव साधत असतात. अशी माहीती मिळते या करिता वनपरिक्षेञविभाग जागरुक होणे अत्यावश्यक आहे. माञ तसे होतांना दिसुन येत नाही वन्यजीवांच्या शिकारी होऊ नये या करिता वनविभागाने गस्त वाढवावी अशी वन्यप्रेमीची मागणी होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी