नांदेड| जेष्ठ नेते,माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांचे खंदे समर्थक मकसुद पटेल लोहगांवकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण पक्षसंघटनवाढीसाठी यापूढेही कर्तव्यतत्पर राहू अशी ग्वाही त्यांनी नियुक्तीनंतर दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जोवद हबीब यांनी हि नियुक्ती केली असून तसे नियुक्ती पत्र दिले आहे.
मकसुद पटेल लोहगांवकर यांनी विद्यार्थी चळवळीत सक्रिय योगदान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून निष्ठेने पक्षात कार्यरत आहेत.प्रारंभी नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात शाखाप्रमुख म्हणून त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या माध्यमातून कार्य सुरू केले होते. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न निवारणासाठी त्यांनी प्रयत्नशील राहिल्याने त्यांची शहर उपाध्यक्ष म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पक्षाच्या औद्योगिक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष,पक्षाच्या शहर जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच,पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे.
विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासह जिल्ह्यात पक्ष संघटनवाढीसाठीही ते सातत्याने प्रयत्न करीत असतात.त्यामुळे त्यांना आगामी काळात प्रेरणा देण्यासाठी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. लोहगांवकर यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत असून माजी मंत्री कमलकिशोर कदम,माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर, माजी खासदार फौजियाखान, आ.राजु नवघरे, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे,माजी आमदार प्रदिप नाईक, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा,महाराष्ट्र प्रदेश पक्षनिरिक्षक सलिम सारंग,प्रदेश उपाध्यक्ष खदिर मौलाना औरंगाबाद, इरफान अली शेख बुलढाणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, प्रा.यशपाल भिंगे,ज्येष्ठ नेते मो.मकबूल सलीम,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक कैलास गोरठेकर, लक्ष्मणराव मा.भवरे,आनंद पाटील,दासराव पाटील पुयड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, फेरोज पटेल, अल्पसंख्याक विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.मुजाहिद खान, मो.जाविद सर भास्कर भिलवंडे, विश्वांभर पवार,फिरोज इनामदार, नागनाथ पाटील सावळीकर,शेख जाकीर, बंटी लांडगे,गणेश तादलापूरकर, सय्यद मौला,दत्ता पाटील तळणीकर, राहुल जाधव, मोहसीन खान आदींनी लोहगांवकर यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.