नांदेड| नांदेड येथील ऍड. पायल ओमप्रकाष ओझा उर्फ पायल विजय गुरावा यांची लवाद अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 चे कलम 84(4) अन्वये 2022 ते 2025 या कालावधीसाठी अंतिम लवाद यांची नामतालिका नुकतीच जाहिर केली आहे.
औरंगाबाद विभागा अंतर्गत या नामतालिकेत नांदेड येथील ऍड. पायल ओझा (गुरावा) यांचा समावेष आहे. ऍड. पायल ही दक्षिण भारत सारस्वत समाजचे माझी अध्यक्ष, परळी वैद्यनाथ बॅकेचे माजी संचालक स्व. श्री. ओमप्रकाष कन्हैयालाल ओझा (ओ. के. ओझा) यांची मुलगी असून नांदेड येथील मुद्रांक विक्रेते श्री. रमेषचंद्र अभिशेकजी गुरावा (षर्मा) यांची सून आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
