नांदेड| राज्य टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 23 व्या राष्ट्रीय स्पर्धेला दि. 2 एप्रिल रोजी स्वा.रा.ती.म. विद्यापीठात सुरुवात झाली.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते झाले. यावेळी संत बाबा बलविंदर सिंगजी, टेनिसव्हॉलीबॉलचे संस्थापक डॉ. व्यंकटेश वांगवाड, छत्रपती पुरस्कार विजेते अशोक दूधारे , डॉ.दीपक बच्चेवार , क्रिडा संचालक डॉ. विठ्ठल सिंह परिहार, जिल्हा क्रिडा अधिकारी राजेश्वर मारावार, सत्यजित चिखलीकर, सतीश भेंडेकर, जनार्दन गुपीले आदींची उपस्थिती होती.
स्पर्धे साठी आंध्रप्रदेश, तेलंगणा, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश ,यजमान महाराष्ट्रासह २० संघ सहभागी झाले आहेत. दोन दिवसात झालेल्या क्रीडा प्रकारात यजमान महाराष्ट्र संघाने ज्युनियर मुलीच्या गटात बाजी मारली. मुलाच्या गटातही उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाने प्रवेश केला. स्पर्धा यशस्वीते साठी राज्य छत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गुपिले, सतीश भेंडेकर, डॉ. राहुल वाघमारे, कसिम खान, डॉ. रमेश नांदेडकर, गणेश मालवे, शिवाजी क्षिरसागर, सुनील दोसलवार, विनोद जमदाडे, सतीश सावळे, बाबु शिंगणवाड, दिगंबर शिंदे, विशाल गडंबे, राहुल चंदेल, संतोष कांबळे, केंद्रे, ग्यानोबा गिरडे, एकनाथ पाटील, राज्य व जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.
