लोहा| आखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदारकेरोशीन परवानाधारक महासंघाच्या नांदेड जिल्हाउपाध्यक्ष पदी आंबेसांगवी चे माजी उपसरपंच तथा पत्रकार अनवर शेख यांची निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्र महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश गांजापुरकर यांनी दिले आहे.
आंबेसांगवीचे माजी उपसरपंच पत्रकार अनवर शेख यांनी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदावर उत्कृष्ट काम केले. तदनंतर अखील महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या उपजिल्हाध्यक्ष पदावर बढती देण्यात आली आहे.
या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष रमेश गांजापुरकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष आशोक कापशीकर, जिल्हा कार्याध्यक्ष किशनराव सावंत,पंडीत ढोले,जिल्हामहासचिव श्रीदत्त घोडजकर, जिल्हासंघटक पि. पी.आरेवार,सय्यद मुस्तफा,खिजर अहेमद,अमीर हामजा,मधूकर ढोले, मुजम्मील गौस,साहेबशिंह चंदेल, अंकदास रातोळीकर, निसारोद्दीन गौस मोईयोद्दीन, शहरध्यक्ष संतोष कोल्हे,लोहा तालुकाध्यक्ष हनमंतराव जाधव, प्रदिप पेनूरकर, डोलाराचे मारोती पाटील बेटकर,माळकोळीचे प्रदिपशिंह परीहार अदीसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.