उस्माननगर, माणिक भिसे। येथील सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचालित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक क्षणाला, समाजात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत, परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आईचा गुलाब पुष्प देऊन जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती मनिषा भालेराव या भगिनी होत्या.तर प्रमुख पाहुण्या म्हणून विद्यार्थ्यांच्या माता ( आई ) सौ.सविता ल.कांबळे ,सौ.वसुंधरा पांडे,सौ.संगिता गवळी,सौ.सिमा कांबळे,सौ.नंदा सोनटक्के,सौ.लोढे,सौ.वारकड, सहशिक्षिका नगमा शेख, यांच्यासह अनेक महील माता उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर गावातील विद्यार्थ्यांच्या मातेचा विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.विद्यार्थीनीनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले.संपूर्ण भारतभर जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे.सम्राट अशोक प्राथमिक शाळेत ज्या ( माता ) महीला की,मुल ,चूल , काम, आणि कष्ट या चौकटीत राहून घराचा प्रपंचात राहून मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या मातेचा सम्राट अशोक प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनी महीलाचा सन्मान करण्यात आला.जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये शालेय स्तरावर निबंध स्पर्धा, कबड्डी,खो खो, रांगोळी स्पर्धा,भाषाण, वेशभूषा, सामान्य ज्ञान स्पर्धा यासह विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मातेच्या हास्ते करण्यात आले.
मुख्याध्यापक राहूल सोनसळे यांनी प्रास्ताविकात महीले विषयी आपले मनोगत व्यक्त केले, तर सुत्रसंचलन देविदास डांगे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महीला विषयी आपले मनोगत व्यक्त केले.तर सहशिक्षक राक्षसमारे यांनी स्त्रीभ्रूणहत्या वरील सुंदर असे गीत गाऊन अनेकांना भुरळ घातली.टाळ्याची दाद मिळाली. यावेळी पत्रकार प्रदीप देशमुख, लक्ष्मण कांबळे, माणिक भिसे, लक्ष्मण भिसे, यांच्यासह भगवान राक्षसमारे,मन्मथ केसे, नितिन लाटकर,शेख शकील यांनी परिश्रम घेतले.यावेळी पालक, विद्यार्थी उपस्थित होते.