ऑनलाईन लेक्चर आणि वस्तीगृह सुरू करण्याची मागणी
नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ऑफलाइन लेक्चर घ्यावेत व विद्यापीठातील वस्तीगृह तात्काळ सुरू करावीत, या मागणीसाठी एसएफआय विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटीच्या वतीने कुलगुरू ना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. आठ दिवसा च्या आत विद्यापीठातील वस्तीगृह सुरू करावेत,अन्यथा यापुढे विद्यापीठात येणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येईल असा इशारा देखील एसएफआय ने दिला.
गेल्या दोन वर्षापासून ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे पुढील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आता ऑफलाइन शिकवणी वर्ग भरावेत अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत. विद्यापीठातील विविध संकुलाच्या परिक्षा सुरू होत्या.त्यामुळे विद्यार्थी शांत होते. मात्र अनेक संकुलातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा या आत्ता संपल्या आहेत. त्यामुळे ज्या संकुलाच्या परिक्षा संपल्या त्या संकुलातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दृष्ट्या विचार करून पुढील सेमिस्टर चे शिक्षण ऑफलाइन पद्धतीने सुरू करावेत. त्याच बरोबर ग्रामीण भागातून शिक्षणासाठी विद्यापीठात येणाऱ्या गोरगरींब विद्यार्थ्यांना रूम किरायणे घेऊन राहणे परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षण सोडून देण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तात्काळ विद्यापीठातील वस्तीगृह सुरू करावीत हि मागणी करण्यात आली.
वस्तीगृहाची पहिली यादी यापुर्वी प्रकाशित झाली, फीस देखील भरून घेण्यात आले. मात्र दुसरी यादी अध्याप प्रकाशित करण्यात आली नसल्यामुळे वस्तीगृहाची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे रखडलेली प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांना आठ दिवसाच्या आत वस्तीगृहात राहण्याची मुभा द्यावी अशी मागणी होत आहे. या निवेदनावर एसएफआय विद्यार्थी संघटनेचे काॅम्रेड पवन जगडमवार , राजवाड शशिकांत , बोकन सोरभ , अक्षय लोंढे , मस्के अभिषेक , कोकाटे सुनिल आदी विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
" विद्यापीठातील वस्तीगृह सुरू करण्यााठी एसएफआय ने वारंवार मागणी केली. मात्र कुलगुरू महोदयांनी विद्यार्थ्यांच्या या मागणी कडे सर्रासपणे दुर्लक्ष केल्यामुळे आत्ता एसएफआय विद्यार्थी संघटना आक्रम झाली आहे. आठ दिवसाच्या आत्ता वस्तीगृह सुरू न झाल्यास यापुढे विद्यापीठात येणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येईल. - काॅम्रेड पवन जगडमवार सदस्य एसएफआय विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटी नांदेड,