नांदेड। स्वयंअनुशासन, शिक्षण आणि जिद्द बाळगून महिलांनी आपले स्वतःचे वेगळे स्थान समाजात निर्मित करावे. शिक्षण आत्मसात करीत असलेल्या महिला, युवती व मुलींवर देशाच्या विकासात योगदान करण्याची मोठी जवाबदारी असल्याचे मत डॉ विकास कदम यांनी व्यक्त केलं.
श्री गुरु गोबिंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालय येथे मंगळवार, दि 8 मार्च रोजी आयोजित महिला दिवस सत्कार कार्यक्रमात ते अध्यक्षपदी बोलते होते. यावेळी अतिथि म्हणून पत्रकार व साहित्यकार स. रवींद्रसिंघ मोदी, सुप्रसिद्ध वकील श्री विलास वळकीकर, प्रा.अमोल धुळे, प्रा. विपिन कदम, प्रा. संजय नरवाडे, शारदा कुलकर्णी मॅडम, भास्कर पाईकराव, बालाजी कुलकर्णी, रोहित माळी यांची उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ विकास कदम पुढे म्हणाले, दरवर्षी आपण महिला दिवस कार्यक्रम उत्साहाने साजरा करतो आणि यामुळे महिला वर्गात स्वतः बद्दल एका प्रकारची जाणीव विकसित होते. अशा कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन युवती, विद्यार्थिनीं व महिला विविध क्षेत्रात ध्येय गाठण्यासाठी अग्रेसर होतात. महाविद्यालयाच्या वतीने अशा कर्तबगार आणि ध्येयनिष्ठ महिलांना महिला दिनानिम्मित्त शुभेच्छा. महिलांनी स्वतःचे स्थान कायम करून देशासाठी आपले योगदान द्यावे.
कार्यक्रमात महाविद्यालयातील स्टॉफ आणि विद्यार्थिनींचा गुलाबाचे फूलं देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी पत्रकार व साहित्यिक स. रवींद्रसिंघ मोदी यांनी आपले विचार मांडले. सध्या यूक्रेन मध्ये युद्धाच्या परिस्थितीत लाखों महिला आणि मुलीं मृत्युशी सामना करीत आहेत. तेथे आकाशातून बामांचा वर्षाव सुरु आहे. अशा भयंकर परिस्थितींचा सामना करणाऱ्या आणि संकटात सापडलेल्यांच्या वेदनांना आजचा महिला दिवस समर्पित करतो असे पत्रकार मोदी म्हणाले. शिवाय प्रत्येक विद्यार्थींनीनी आपले विवरणपत्र सक्षमपणे घडवावे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात यिन विद्यार्थी प्रतिनिधी श्वेता पाटील, सोनम खोडके, माधुरी थोरात, दीक्षा थोरात, सीमा सोनटक्के, प्रतीक्षा चवणे, संदीप सिरसाट, श्रीकांत खिल्लारे, राजेश म्हात्रे, विशाल पाईकराव, सिद्धार्थ वाठोरे, दत्ता जाधव, संदीप वाघमारे व इतर उपस्थित होते.