श्री रेणुका संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा २८-२९ मार्च रोजी बेमुद्दत धरणे व उपोषण (अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे महिला दिनी निवेदन)
नांदेड| जागतिक महिला दिवस आठ मार्च रोजी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा कमिटीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून, माहूर गडावरील श्री रेणुका देवी पायथ्याशी सुरू असलेले सत्याग्रह आंदोलन तातडीने थांबवावे व त्या कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या सोडवावाव्यात तसेच नांदेड तालुक्यातील मौजे खूरगांव,नांदुसा व चिखली बु. येथील महिलांना रेशनकार्ड व घरकुल योजनेचा लाभ द्यावा ह्या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांसह मुख्यमंत्री,मुख्य सचिव,विभागीय महसूल आयुक्त औरंगाबाद,पोलीस अधिक्षक आणि पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे वजिराबाद यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात रेशन व घरकुल प्रश्न गंभीर बनत चालला असून माहूर गडावरील मागील दोन महिन्यापासून सुरू असलेले आंदोलन थांबवावे अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे.मागण्या सोडवून सहकार्य करावे अन्यथा दि.२८-२९ मार्च रोजी अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड समोर धरणे आंदोलन व उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.
निवेदनावर जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड,तालुका अध्यक्ष कॉ.लता गायकवाड,कॉ.उज्वला पडलवार,समुद्रा अडकिणे,मीरा जाधव,सुनिता जाधव,भगिरथा लेंडाळे,लक्ष्मीबाई पटणे,सुलोचना लेंडाळे,सुनिता डांगे,ज्योती पांचाळ,सुरेखा पटणे,स्वेता जाधव,शारदा पांचाळ,पद्मीनबाई बारसे,जस्वंती गंगातिरे,प्रियंका स्वामी,विजयमाला पचलिंग,कल्पना कानगुले आदींच्या स्वाक्ष-या आहेत.