नांदेड| भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि जागतिक रंगभूमीदिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित उपयोगजीवी कला संकुलाच्या वतीने दि. २१ ते २७ मार्च या कालावधीत ‘नाट्य व अभिनय कार्यशाळा सप्ताह’ चे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ मार्च रोजी विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात स. ११:३०वा. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अॅकॅडमीचे संचालक प्रो. योगेश सोमण हे बीजभाषण आणि मार्गदर्शन करणार आहेत. दि. २२ मार्च नंतर चे सर्व सत्र संकुलाच्या सभागृहात स. ११ ते ४ या वेळेत होणार आहेत.
डॉ. मंगेश बनसोड, डॉ. सतीश पावडे, डॉ. नीरज बोरसे, इब्राहिम अफगाण, अश्विनी भालेकर, कविता जवादवार, रमेश होलबोले व दिनेश कवडे इ. महाराष्ट्रातील मान्यवर अभ्यासक, दिग्दर्शक, कलावंत नाट्यप्रेमींना मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा निशुल्क असून पूर्णवेळ उपस्थित राहू शकणारे विद्यार्थी किंवा नाटकाची आवड असणारे कलावंत या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतील. पूर्व नोंदणीसाठी इच्छुकांनी नाट्यशास्त्र विभागाचे प्रा. राहुल गायकवाड (मो.क्र. ९०४९०४३८९४) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संकुलाचे संचालक डॉ. पी.विठ्ठल यांनी केली आहे.