महिला पोलिसांनी सांभाळला हिमायतनगर ठाण्याचा कारभार
हिमायतनगर, अनिल मादसवार| दि.०८ मार्च जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान केला जातो. आणि यशस्वी महिलांचा आदर्श समजापुढे ठेवण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी जागतिक महिला दिनी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्यांवर पोलिस ठाण्याच्या कारभाराची जबाबदारी सोपविली होती. सर्व महिलांनी दिवसभर उत्तम प्रकारे यशस्वीरित्या काम सांभाळत हम भी कुछ कम नही... हे सिद्ध करून दाखविले आहे. तसेच केवळ महिला दिनी सन्मान न करता ३६५ दिवस महिलांना सन्मान मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नसल्याचे समाजातील अनेक कर्तुत्ववान महिलांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असताना हिमायतनगर पोलिस ठाण्यात ४ ते ६ महिला पोलीस कार्यरत आहेत. आज पोलीस अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता दिलीपराव जाधव मैडम, ठाणे अंमलदार म्हणून महिला पोलिस कर्मचारी कोमल बालाजी कागणे मैडम यांनी यशस्वी कारभार चालविला. तर कीर्तिताई सदावर्ते अहवाल ऑनलाईन, कोले मैडम वायरलेस जबाबदारी यशस्वीरीत्या पार पडली. तर महिला होमगार्ड परीक्षा व इतर बंदोबस्त म्हणून काम पहिले.
तसेच अन्य महिला कर्मचार्यांनी आपली कर्तव्ये यशस्वी पद्धतीने सांभाळली. यावरून महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देणाऱ्या समाजातील महाभागांना पोलीस दलात निर्भीडपणे काम करणाऱ्या डेंशींग महिला कर्मचार्यांच्या कर्तुत्वाने एक प्रकारे पुरुषापेक्षा महिलाही कमी नाहीत याची जाणीव करून दिली आहे. यावेळी पोलीस ठाण्याच्या वतीने नेमणुकीवर असलेल्या सर्व महिलांचा पुष्पगुच्छ देऊन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी सन्मान केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक सपोनि नंदलाल चौधरी, डीएसबी अविनाश कुलकर्णी, सौ.लक्ष्मबाई भवरे, श्रीमती पंचफुलाबाई लोणे, सौ.चंद्रकलाबाई कागणे, सौ. सुनंदा दासेवार, हेमंत चोले, अशोक सिँगांआड, ज्ञानेश्वर जिंकलवाड, पवन चौदंते, नितीन राठोड, संजय जोंधळे आदींसह होमगार्ड, पोलीस कर्मचारी आदीं उपस्थित होते. तसेच होमगार्ड संघटनेच्या वतीने सर्व महिलांचा श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला.
पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या आदेशानुसार हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व महाविद्यालयात शाळेत भेट देऊन जागतिक महिला दिनाच्या निमीत्ताने पोलीस ठाणे हिमायतनगरच्या वतीने सर्व मुलींना व ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या महिला प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक महिलांचा पोलीस निरीक्षक भगवान कमबळे यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला.