उस्माननगर, माणिक भिसे| महीलांना त्यांच्या पायावर उभे करण्यात आर्थिक सक्षमीकरण करण्यात महीलां बचत गट चळवळ मोठे योगदान देत आहे.व शासनाच्या विविध योजनांचा मिळून देण्याचा प्रयत्न राहील असे मत रावणगावकर यांनी व्यक्त केले.
उस्माननगर येथून जवळच असलेल्या कलंबर ( खुर्द) ता. लोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष मिनाताई पेठवडजकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नुकताच गावातील ग्रामदैवत मारुती मंदिर प्रांगणात सायंकाळी ६ वाजता महिला बचत गट मार्गदर्शन,व शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रांजलीताई रावणगावकर, कार्याध्यक्ष सुनंदाताई जोगदंड, गावच्या सरपंच लतिकाताई घोरबांड, माजी सरपंच सुनीताताई शेठवाड, अंजनाताई घोरबांड, मुद्रिकाताई घोरबांड, चंद्रसेनाताई घोरबांड आदींची उपस्थिती होती. यावेळी " गावातील महिलांनी एकत्रित येऊन बचतगट माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. यशस्विनी होण्यासाठी सामुदायिक शक्ती महत्वाची भूमिका ठरवू शकते. " असे मत रावणगावकर यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी गावातील विविध १७ महिला बचतगट च्या अध्यक्षांचा यथोचित सन्मान करण्यात आला. गावातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते चौथी च्या विद्यार्थी यांना वही, पेन देण्यात आले. यावेळी बोलताना रावणगावकर म्हणाले की, मिनाताई पेठवडजकर यांच्या प्रयत्नातून व सहकार्यातून महिलांसाठी चांगल्या योजना राबविण्याचा प्रयत्न राहील असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास डॉ. सुर्यकांत पेठवडजकर, दिगंबर शेठवाड, माधव बोईनवाड, अंकुश कोठेवाड, आप्पाराव मालीपाटील, माधव पवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेड चे माधव घोरबांड यांनी केले. यावेळी गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.