लोहा| नवसंकल्प सेवा भावी संस्था चिखली च्या वतीने लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथे श्रीकृष्ण गोशाळा येथे जनावरांसाठी पशुरोग निदान शिबिर व लसीकरण आणी निर्जीव विकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी जिंकलोड,चाकोते, संचालक डांगे, श्याम पाटील जाधव, बालाजी वाकोडे, पद्माकर कल्याणकर यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते . या वेळी डॉ. जिंकलोड यांनी जनावरांवर मार्गदर्शन केले त्यामध्ये लसीकरणाची मोहीम ,लस, अन्न,चारा,पाणी याबद्दल सखोल माहिती दिली.
त्यामुळे पशु पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते ही सेवाभावी संस्था सदैव आरोग्याच्या हिणाचे उपक्रमआहेत कार्याच्या उपक्रम नव नवीन उपक्रम घेऊन घेऊन समाजसेवा वा करण्यासाठी सदैव पुढाकार घेत असते. लोहा तालुक्यातील पोखर भोसी येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले.