लोहा| मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी लोह्यात तहसील कार्यालया समोर प्रदीप चव्हाण यांनी शीर्षासन आंदोलन केले तसेच अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी पाठींबा दर्शवित तहसील कार्यालया समोर या आंदोलनात सहभागी नोंदविला.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी लोह्यात प्रदीप चव्हाण (जुना लोहा ) यांनी " शीर्षासन " केले व या अनोख्या पद्धतीने त्यांनी खा सभाजीराजे यांच्या आंदोलनास पाठींबा दर्शविला या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा झाली यावेळी त्यांच्या सोबत
एक मराठा लाख मराठा समितीने कार्यकर्ते लोह्याचे उपनगराध्यक्ष, शरद पाटील पवार, सुधाकर पवार, ऋषिकेश जोगदंड सूर्यकांत गायकवाड, शहाजी पाटील पवार, भानुदास पाटील पवार, दयनेश्वर पवार, दीपक चितलीकर, सुनील कदम, सचिन सायाळकर, व्यंकट घोडके,सुनील पवार, शिवराज पाटील चितळीकर यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सर्व एक मराठा लाख मराठा समिती लोहा तालुका सहभागी झाले व त्यांनी खा संभाजीराजे यांनी पाठींबा दर्शवित मविआ सरकारने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली.