लोहा| सह्याद्रीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विज्ञान प्रतिभेचा उत्कृष्ट आविष्कार आपल्या प्रयोगातून सादर केला असून त्यांची प्रज्ञा आणि बुद्धिमता अलौकिक दिसून आली.शाळा आणि शिक्षकांची विध्यार्थ्यां साठीची समर्पित भावना यातून अधिक स्पष्टपणे अधोरेखित करणारी असून, प्रत्येक विध्यार्थ्यांत असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्यक्ष प्रयोगातून समोर आणण्याचा यशस्वी प्रयत्न या विज्ञान जत्रेतून दिसून आला असे प्रतिपादन कंधारचे उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक यांनी केले
लोहा पारडी येथील सह्याद्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन कृतिशील संस्थापक सुदर्शन शिंदे व संचालिका सौ जयश्री शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे, यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी कंधारचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक,होते प्रमुख पाहुणे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के,शिक्षण विस्तार अधिकारी, नांदेड चे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश केंद्रप्रमुख बाबुराव फसमल्ले, संस्थापक दिगंबर क्षीरसागर, विवेक देशमुख यासह मान्यवर उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी मंडलिक यांनी विज्ञानाच्या गोष्टीतून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित कसा होतो याबाबत सांगताना शाळेतील उपक्रम व बाल वैज्ञानिक होण्यास असे शालेय उपक्रम घेणे आवश्यक असतात टिकाऊ व विना खर्चिक वस्तूंची निर्मिती करून प्रेरणा देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातूनही विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक बनावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त करत मार्गदर्शन केले.
राज्याचे सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रयोगाची पाहणी केल्या नंतर . सह्याद्री शाळेने इमारत आणि इतर भौतिक सुविधा दर्जेदार दिल्या असून संस्थेचे प्रमुख सुदर्शन शिंदे यांची विद्यार्थीना गुणवत्तापूर्ण शिक्षणा देण्यासाठीची धडपड बाबत गौरवोद्गार काढले त्याचबरोबर अशा विज्ञान प्रदर्शनामुळे बालपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यास मदत होते व मुले विज्ञाननिष्ठ बनतात हे मार्गदर्शन केले.
तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांनी थोर शास्त्रज्ञ सी वी रमन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने देशभर राष्ट्रीय विज्ञान दिन दिवस म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी बालपणापासून वैज्ञानिक दृष्टिकोन व त्यांचा वापर या विषयी मार्गदर्शन केले आणि विज्ञान प्रदर्शनातील बाल शास्त्रज्ञांना प्रोत्साहन दिले. असे सांगितले. या विज्ञान प्रदर्शनात विविध प्रकारच्या प्रतिकृती आधुनिक तंत्रज्ञान सौरऊर्जेची निर्मिती व त्याचे फायदे याविषयी संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपमुख्याध्यापिका सुप्रिया वाडेवाले यांनी केले तर आभार आभार सुमित चौडेकर यांनी मानले.