हेल्मेट असते तर वाचले असते जीव, भरधाव कारने दुचाकीला उडविल्याने झाला होता अपघातात
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सरसम नजीक काल झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, एकाच उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृत्यूचा आकडा वाढला आहे. तर एकजण मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती वाळकेवाडी येथील नागरिकांनी दिली आहे.
हिमायतनगर-भोकर हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून वाहनांची मोठी वर्दळ झाली आहे. या महामार्गाच्या निर्मित्ती वेळी तेलंगणा आणि विदर्भाच्या धर्तीवर धानोडा-भोकर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर डिव्हायडर, करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नसल्याने किनवट-हिमायतनगर- भोकर हा राष्ट्रीय महामार्ग भरधाव वेगातील वाहन धारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. दि.१६ मार्च बुधवारी भोकरकडून हिमायतनगरकडे येणाऱ्या एका भरधाव कारने हिमायतनगर शहरातील आठवडी बाजार करून वाळकेवाडी गावाकडे जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीला जबर धडक दिली. हि घटना सरसम नजीक असलेल्या महादेव मंदिरासमोर राष्ट्रीय महामार्गावर दुपारी ४ वाजता घडली होती.
या अपघातात हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाळकेवाडी येथील रहिवाशी असलेले केरोजी वामन हुरदुके (२४), गंगाधर परसराम माजळकर (३०) हे दोघेजण जागीच ठार झाले, तर गणपत प्रल्हाद वागतकर आणि दिगंबर प्रल्हाद वागतकर हे दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्या दोघांवर नांदेड येथे उपचार सुरु असताना दिगंबर प्रल्हाद वागतकर यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे या अपघातातील मृत्यूची संख्या ३ झाली आहे. तर एक तरुण मृत्यूशी झुंज देत आहे. एकाच गावातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे वाळकेवाडी गावावर शोककळा पसरली असून, शोकाकुल वातावरणात या दोघांवर रात्रीला अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर तिसऱ्या मयताचे शव आनल्यानंतर अंत्यविधी होणार आहे. घरातील करते धरते युवक अपघातात दगावल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लहान लहान चिमुकले वृद्ध आई वडिलावर आभाळ कोसळले आहे.
धानोडा - किनवट - हिमायतनगर - भोकर पर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं.१६१ चे काम मागील तीन वर्षापासुन रखडत सुरु आहे. या रस्त्यामधून डिव्हायडर नसल्याने रस्ता झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक अपघात झाले. यामुळे अनेकांचा जीव गेला आहे असून, भविष्यात असे अपघात होणार नाहीत यासाठी राष्ट्रीय महामार्गावर सुचनाफलक, ठिकठिकाणी स्पीडब्रेकर, डिव्हायडर आणि वाहनांचा वेग मर्यादित करणे गरजेचे असल्याचे मत अपघाताच्या घटनेनंतर अनेकांनी व्यक्त केले.
हेल्मेट असते तर वाचले असते जीव - किनवट-हिमायतनगर-भोकर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून, अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. असे असताना देखील बहुतांश दुचाकीस्वार हेलमेट वापरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. खरे पाहता हेल्मेट हे सुरक्षेचे साधन आहे, मात्र अंकेजन याला कायद्यची सक्ती म्हणून पाहतात, तर यात पळवाट म्हणून हेल्मेट न वापरता अनेक वाहनधारक पोलिसांना चकमा देण्यात दुचाकीस्वार पटाईत झाले आहेत. मात्र अपघातात चकमा देता येऊ शकत नाल्याने मृत्यूच्या दारात पोचत आहेत. होणारेय अपघाताची तीव्रता लक्षात घेता दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरण्यावर भर देऊन स्वतःच्या सुरक्षेला महत्व देणे गरजेचे असल्याचं मत जाणकार नागरीकातून व्यक्त केले जात आहे.