आर जी एस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यपदी तेलंगणा राज्यातील अर्जुन सोमगिरी यांची नियुक्ती -NNL


हदगाव,शे चांदपाशा।
शहरातील नामांकित असलेल्या आर जी एस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यपदी तेलंगणा राज्यातील अर्जुन सोमगिरी यांची नियुक्ती संस्थेने केली असून त्यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे .अर्जुन सर हे गणित तज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचे पदवी-पदव्युत्तर व व्यावसायिक शिक्षण तेलंगणा राज्यातील उस्मानिया विद्यापीठातून झाले आहे यापूर्वी त्यांनी विवेकानंद स्कूल हरदडा, होरायझन स्कूल नांदेड, नारायणा इंटरनॅशनल स्कूल नागपुर चंद्रपुर आदी ठिकाणी शैक्षणिक कार्य केले आहे .

गेल्या दोन-तीन वर्षापासून covid-19 मुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून ते भरून काढण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा तसेच JEE NEET परीक्षेत आपले अधिकाधिक विद्यार्थी यश कसे मिळवतील याकडे आपले लक्ष राहणार असून अभ्यासाबरोबरच शिस्त व राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजवून उद्याचे सुजाण नागरिक घडविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .

अर्जुन सरा सोबतच भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयात गोल्ड मेडल प्राप्त रेवती मॅडम ह्या सुद्धा शाळेत रुजू झाल्या असून आगामी शैक्षणिक वर्षात विविध वैज्ञानिक व रासायनिक उपकरणे हाताळून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप भुरे व संचालिका वंदना भुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्जुन सर व रेवती मॅडम यांनी आपला पदभार स्वीकारला यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी