नांदेड|अहिल्याबाई होळकर स्मारक समिती, नांदेडच्यावतीने दि. १६ मार्च २०२२, बुधवार रोजी सायंकाळी ठिक ७ वाजता सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा आयटीआय चौक, नांदेड येथे रणझुंजार, ज्वलंत शौर्याचा महामेरु, श्रीमंत सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांची ३२९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरक्षण हक्क संवर्धन समितीचे प्रदेश उपाध्यक्ष सोपानराव मारकवाड हे होते तर जयंती सोहळ्यास कामगार नेते तथा महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त गुणवंत एच. मिसलवाड, अहिल्याबाई होळकर स्मारक समितीचे टोपाजी काकडे, आदिवासी मन्नेरवारलू समाजाचे नेते दत्तात्रय अन्नमवाड, दलित सेनेचे राज्य संघटन सचिव संजय वाघमारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते मायाभाऊ नांदेडकर, वंचितचे नेते प्रकाश सोंडारे, शाम निलंगेकर, ऍड. यशोनिल मोगले यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन कनिष्क सोनसळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप काकडे, नागोराव वाघमारे, शेख चॉंद, मोहम्मद मारुफ, गंगाधर वडने, विठ्ठल कदम आदींनी सहकार्य केले.