नांदेड| सिक्युरिटी गार्डची नौकरी करणाऱ्या युवकाने स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान मिळविला आहे. त्याने आपल्या यशाचे सर्व श्रेय मित्र परिवाराला दिले असून, पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालणाऱ्या गोपीनाथ केंद्रे यांचा मित्रपरिवराच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यावेळी शंकर जिल्हेवाड ( इंडियन नेव्ही ) , उद्धव भिसे , विशाल बनसोडे , शिवाजी जाकापुरे , परमेश्वर दगडगावे , सचिन जाधव , कपिल कदम , अविनाश स्वामी , बालाजी जाधव , पत्रकार तुकाराम दाढेल पत्रकार शिवराज दाढेल राहुल भिसे , शंकर गालफाडे , बाबू डिकळे , अंकुश खोकुरले , ओमकार सरोदे , शरद अमोलगोंडे आदी उपस्थित होते . गोपीनाथ किशनराव केंद्रे यांची पोलीस उपनिरीक्षक ( PSI ) पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सुदृढ असल्यामुळे NCC मध्ये प्रवेश घेऊन देश शेवा करायची मनी इच्छा बाळगली व तसे परिश्रम घेत राहिला सुरुवातीच्या काळात पदरी अपयश आले . आई - वडील वयस्कर त्यात घरून गरीब व हलाकिची परिस्थिती असल्यामुळे मुंबई येथे ( BEST ) मध्ये मागील ७ वर्षांपासून वॉचमन ( security guard ) चा जॉब करण्यास सुरुवात केली. तसेच सद्यस्थितीत ही तो जॉब चालूच आहे हे जॉब करतकरत डगमगून न जाता सकारात्मक विचार करत गरिबीची जाण व मेहनतीच्या जोरावर पुढे त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ( PSI ) पूर्व व मुख्य परीक्षा दिली.
त्यात चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन यश मिळवले मध्यंतरी कोरोना काळामुळे अंतिम यश प्राप्ती आठी तीन वर्षाचा काळ गेला कोरोना काळा नंतर ही आपल्या यशाचे शिखर राखत सन २०२२ मध्ये पार पडलेल्या मौखिक व शारीरिक चाचणी परीक्षेत घवघवीत यश मिळवले . गोपीनाथ किशनराव केंद्रे यांची पोलीस उपनिरीक्षक ( PSI ) पदावर निवड झाल्याबद्दल त्यांनी मिळवलेल्या त्यांच्या यशाबद्दल मित्र परिवाराच्या वतीने गोपीनाथ केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला . गोपीनाथ केंद्रे यांनी आपल्या यशाचे श्रेय हे स्वतः न घेता तसेच आपल्या आई - वडिलांच्या ही अगोदर भगवान श्रीकृष्ण व मित्र सुदामा सारखी घट मैत्री जपणाऱ्या मित्र शंकर जिल्हेवाड ( इंडियन नेव्ही ) , राहुल जोशी , जनार्दन तिडके , नीळकंठ तिडके , अमर केंद्रे आदींना दिले आहे .